जामनेर : महावीर मार्गावरील बाधीत राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या कुटुंबातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यातील बाधीतांची संख्या ४९ झाली आहे. या नऊ जणांना पळासखेडे बुद्रुक, ता. जामनेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात आले. सेंटरमध्ये २० व कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विलगीकरण कक्षात २६ जण असल्याचे सांगण्यात आले.
जामनेरला एकाच कुटुंबातील नऊ बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:26 IST