जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:53 PM2019-11-01T17:53:24+5:302019-11-01T17:55:56+5:30

न्यू इंग्लिश स्कूल १९९८ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला.

Jamner Alumni Meet | जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी दिवाळी सणानिमित्त एकत्र आले होतेसर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या

जामनेर, जि.जळगाव : न्यू इंग्लिश स्कूल १९९८ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात कोदली रोड स्थित संदीप डांगी फार्ममध्ये पार पडला.
सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी दिवाळी सणानिमित्त एकत्र आले होते. सर्व मित्र मैत्रीनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व एकमेकांचे दु:ख विसरून मस्तीच्या पाठशालेत रमून जाण्यासाठी २० वर्षांनंंतर एकत्र आले.
सर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या व आपापला परिचय करून दिला. मेळाव्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सकाळी १० वाजता सस्नेह मेळाव्यास सुरवात झाली. या मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, चेन्नई, नाशिक, बºहाणपूर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, जळगाव, अमळनेर, भुसावळ, ठाणे, जामनेर व इतर शहरातील मित्र व मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमित डांगी, सागर पंडित, हर्षल चांदा, अनिल डोंगरे, नितीन झाल्टे, अमोल सुरळकर, रुपेश बाविस्कर, मनोज पाटील, विलास कोठारी, विलास बोहरा, उमाकांत पाटील, विजय महाजन, अमित सैतवाल, दीपक माळी, जयश्री पाटील, सुचिता खर्चे, विद्या पाटील, शारदा माळी, सीमा चौधरी, अनघा भोकरे, स्वाती पाटील, सोनाली पवार, दीपाली पाटील, ज्योती दौड, प्रीती पाटील, भारती पाटील, विद्या लोखंडे, पूनम महाजन, रितेश महाजन, गिरीश गोसावी, पंकज सोनार, जितेंद्र विसपुते, श्याम निरखे, प्रशांत पाटील, विशाल पाटील, शैलेश पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, राजेंद्र भोई, अजय पाटील, मयूर पोरवाल, देवेंद्र पाटील यांच्यासह आदी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

Web Title: Jamner Alumni Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.