जामनेरात प्रथमच वाद्य आणि खाद्य महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 05:10 PM2020-02-16T17:10:58+5:302020-02-16T17:12:05+5:30

आनंदयात्री परिवाराच्या वतीने प्रथमच वाद्य आणि खाद्य महोत्सव आयोजित केला आहे.

Jamnar Music and Food Festival for the first time | जामनेरात प्रथमच वाद्य आणि खाद्य महोत्सव

जामनेरात प्रथमच वाद्य आणि खाद्य महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदयात्री परिवारातर्फे आयोजनगृहिणी, कलावंतांच्या कलागुणांना मिळणार वाव

जामनेर, जि.जळगाव : येथील आनंदयात्री परिवाराच्या वतीने जामनेर शहरात प्रथमच वाद्य आणि खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. २१ ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी मराठवाडा, विदर्भाच्या सीमावर्ती भागालगत असलेल्या जामनेर तालुक्यातील वाद्य संस्कृती व खद्य परंपरेवत तीनही भागांचा मेळ दिसून येतो. त्यामुळे त्रिगुणांचा मेळ असलेल्या अशा वाद्य व खाद्य संस्कृतीची तालुक्यातील जनतेला मेजवाणी मिळावी म्हणून जामनेर येथील आनंदयात्री परिवारातर्फे वाद्य व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाकी रोडवरील गोवींद कॉलनी परिसरातील भव्य ओपन स्पेवर या महोत्सवाचे २१, २२ व २३ असे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक खाद्य पदार्थांबरोबरच तांडव नृत्य, गोंधळ, लावणी, किंगरी वाद्य, गृपडान्स अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलांसह कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळून त्यातून छोटेमोठे उद्योजक व कलावंत तयार व्हावे हा यामागचा हेतू असल्याचे मत आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आले. तालुकावासीयांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Jamnar Music and Food Festival for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.