शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जामनेर येथे युवकांच्या पुढाकारातून बहरली वृक्षवल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 2:45 PM

जामनेर येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण संरक्षणस्वत: केला खर्च उपक्रमांचे होते कौतुक

सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे.सर्वत्र बेसुमार वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा ºहास होत असल्याची ओरड होत असताना येथील बिस्मिल्लानगर मधील युवकांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भागातील कब्रस्तानात विहिरीचे खोदकाम केले व या विहिरीला सुदैवाने पाणी चांगले लागल्याने त्याचा वापर करून या युवकांनी कब्रस्तानात सुमारे १०० झाडे लावली. शासकीय योजनेनुसार केवळ झाडे लावून ते थांबले नाही तर त्यांनी दररोज झाडांना पाणी देऊन ती जगविली यासाठी त्यांनी संरक्षक जाळी लावून त्यांचे रक्षणही केले. आज हा परिसर वाढत असलेल्या झाडांमुळे हिरवागार दिसत आहे युवकांच्या या कामाचे नागरिक कौतुक करीत आहेत.लागवडीबरोबर संवर्धन हवेजामनेरलगत मोठे राखीव वनक्षेत्र आह.े काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे वनक्षेत्र ओसाड झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन गत दोन वर्षात शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून विविध भागातील वनक्षेत्रात रोपे लावण्यात येत आहे. मात्र या रोगनांचे संगोपन होत नसल्याचे नंतर केवळ त्या ठिकाणी खड्डे दिसतात. शासनाची ही योजना अतिशय चांगली आहे. मात्र शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.धर्माधिकारी प्रतिष्ठानने जगविली ९०० झाडेजामनेरच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहराजवळील टाकळी बुद्रुक गावात जि. प. प्राथमिक शाळेजवळ सुमारे ९ एकर मोकळ्या जागेत गेल्या तीन वर्षांपूर्वी एक हजार झाडे लावली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकायार्ने झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. झाडांना संरक्षक जाळ्या लावल्याने व नियमित पाणी दिल्याने झाडांची वाढ वेगाने होत आहे. वाढत्या तापमानापासून रक्षणासाठी झाडांना ग्रीन नेट लावण्यात आली. आज हा परिसर हिरवागार झाला असून, त्याचे सारे श्रेय प्रतिष्ठानच्या सदस्यांना आहे.सोनबर्डी हिरवी करावीजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी खर्चून सोनबर्डीच्या विकासाला चालना दिली. या ठिकाणी बांधलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरामुळे भाविकांची वर्दळ वाढली आहे. पालिका प्रशासनाने सोनबर्डी टेकडीवर वृक्ष लागवड करुन परीसर हिरवागार करावा व पावसाळ्यातच या उपक्रमाची सुरवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एकीकडे असे दृश्यशहरातील मुख्य रस्त्यावरील डेरेदार जिवंत झाडांची तोड चौपदरीकरणासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने केल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून ओरड होत आहे तोडण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरणाचा मोठा ºहास झाला आहे वास्तविकत: सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने याकडे लक्ष देऊन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून जगविली पाहिज,े अशी अपेक्षा आहे.पालिकेने पुढाकार घ्यावागेल्या दोन वर्षांपूर्वी पालिकेने कॉलनी भागातील नागरिकांना संरक्षक जाळयांचे व कलमांचे वाटप करुन झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबविला होता. नागरिकांच्या सहकार्याने काही भागातील झाडे जगली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पालिकेने मोकळ्या जागेवर मोठ्याा प्रमाणात वृक्ष लागवड करुन संवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. तसेच जळगाव रोड वरील चौपदरीकरणासाठी वृक्ष तोडण्यात आली होती. ते रस्ते आता उजाड झालेले आहत.े त्यामुळे पालिकेने पुढाकार घेऊन त्या रस्त्यावर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी नागरिकांची आहे

टॅग्स :environmentवातावरणJamnerजामनेर