वरणगाव : महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्याने वरणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महाराष्ट्र माळी समाज महासंघ समाज बांधव यांच्या वतीने बसस्थानक चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, माजी नगरसेवक बबलू माळी, जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, सचिन माळी, दक्षता समिती अध्यक्ष सविता माळी, सखाराम माळी, बापू माळी, नीलेश माळी, किरण माळी, आकाश माळी, सागर महाजन, संकेत माळी, तेजस माळी, रवींद्र माळी, निखिल माळी, संदीप माळी, राजू माळी, कृष्णा माळी, विनायक माळी, अविनाश माळी, बंडू माळी, विजय माळी, अतुल माळी, पिंटू माळी, पवन माळी, भूषण माळी, गोविंदा माळी यांच्यासह माळी समाज तसेच महात्मा फुले समता परिषद आणि माळी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.