शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनुदेवीच्या दर्शनाला गेलेल्या जळगावाच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:38 IST

 मनुदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अशोक गोपाळ सोनवणे (३२, रा. तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मनुदेवी, ता.यावल येथे घडली. मनुदेवीच्या दर्शनापूर्वी अंघोळ करण्याचा मोह अशोकला घातक ठरला.पाण्यात उतरण्यास मित्रांनी त्याला विरोध केला होता, मात्र त्याने ऐकले नाही...आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्दे यावल तालुक्यातील मनुदेवीची घटनामित्रांसोबतचा फोटो ठरला शेवटचामित्रांनी केला होता विरोध

जळगाव :  मनुदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अशोक गोपाळ सोनवणे (३२, रा. तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मनुदेवी, ता.यावल येथे घडली. मनुदेवीच्या दर्शनापूर्वी अंघोळ करण्याचा मोह अशोकला घातक ठरला.पाण्यात उतरण्यास मित्रांनी त्याला विरोध केला होता, मात्र त्याने ऐकले नाही...आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.तुकारामवाडी येथील अशोक सोनवणे हा मित्र भावेश चौधरी, उल्हास पिंपळकर, सिध्दांत पाटील, उमेश पाटील आणि शरद सोनवणे यांच्यासमवेत मंगळवारी दुपारी १२  वाजेच्या सुमारास मनुदेवी येथे दर्शनासाठी जाण्यास दुचाकीने निघाला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मनुदेवी परिसरात सर्व मित्र पोहचले. मनुदेवी पोहचण्यापूर्वी जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे मार्गात असलेल्या सातही पुलावरुन नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह असतो. यातील दुसºया क्रमांकाच्या पुलावर अशोकसह मित्र पोहचले. याठिकाणी अशोकने पाण्यात उभा असतांना त्याच्या मोबाईलमध्ये मित्रांना फोटो काढायला लावला. याचवेळी अशोकने अंघोळीचा आग्रह धरला होता, मात्र मित्रांनी त्याला विरोध केला होता. दरम्यान मोबाईलमध्ये अशोकने काढलेला फोटो त्याचा शेवटचा फोटा ठरला. पश्चात आई लिलाबाई, वडील गोपाल सोनवणे, पत्नी मोनी, मोठा भाऊ संतोष तसेच एक बहिण असा परिवार आहे. भाऊ संतोष हा सेटींगच्या कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वडील हातमजुरी करतात. अशोकच्या मृत्यूचा कुटुंबियांना धक्का बसला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव