शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जळगावकर अनुभवणार ‘झिरो शॅडो डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:51 IST

जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती अर्थात ‘झिरो शॅडो ...

जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती अर्थात ‘झिरो शॅडो डे’ जळगावकरांना सोमवार आणि मंगळवारी अनुभवता येणार आहे. या दोन्ही दिवशी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी खगोलप्रेमी अमोघ जोशी यांच्यातर्फे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे़ या प्रात्यक्षिकाचे फेसबूक लाईव्हद्वारे प्रक्षेपण केले असल्यामुळे खगोलप्रेमींना सावली कशी गायब होते, हे पाहण्याची संधी मिळणार आहे.२१ मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर म्हणजे ० अक्षांशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. भूतलावरील प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अक्षांशावर वसले असून, त्यानुसार जळगाव शहर हे २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहे. तसेच कर्कवृत्ताच्या जवळ आहे. दरवर्षी २१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून दरवर्षी जळगाव शहरात १२ वाजून २४ मिनिटांनी झिरो शडो डे असतो. या दिवसाला शून्य सावली दिवसही म्हणतात. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे शून्य सावली दिवस असतो.लाईव्ह प्रक्षेपण होणारउत्तरायणाच्या काळात उत्तर दिशेकडे हळूहळू सरकतांना सूर्य एका अक्षांशावर साधारण दोन दिवस असतो. त्यामुळे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक २५ आणि २६ मे असे दोन दिवस खगोल प्रेमी अमोघ जोशी यांच्याकडून दाखविण्यात येणार आहे. लॉकडाउनमुळे कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे़ त्यामुळे या भौगोलिक घटनेचा खगोल प्रेमींना आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव