शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जळगावाकरांना १ एप्रिलपासून ३५० रुपयांचा भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:59 IST

घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी २ टक्के शुल्कवाढ

ठळक मुद्देभाजपाने दिली महासभेत मंजुरी; शिवसेनेचा विरोधशहरासाठी एकच सफाईचा ठेका

जळगाव : शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाने अवघ्या तीन महिन्यातच जळगावकरांवर १ एप्रिल २०१९ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली ३५० रुपयांचा भूर्दंड देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधाºयांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला. मात्र शिवसेनेने या ठरावास विरोध दर्शविला.३० नोव्हेंबर रोजी मनपाची महासभा स्वीकृत सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध न झाल्याच्या मुद्यावरून तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा शुक्रवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे आदी उपस्थित होते. जळगावकरांवर लादण्यात आलेल्या या कराच्या ठरावावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाला. तसेच बडतर्फ कर्मचाºयाला कामातून मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावरून कैलास सोनवणे व आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यात देखील शाब्दिक चकमक झाली.समांतर रस्त्याला अडसर ठरणाºया महावितरणच्या पोल स्थलांतरासाठी लागणाºया दिड कोटी रुपयांचा खर्च आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्यामुळे ‘डीपीडीसी’कडून मंजूर झाला. त्यामुळे पाईप-लाईन स्थलांतरासाठी लागणारा खर्च देखील आमदार भोळेंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी करून डीपीडीसीकडून मंजूर करून घ्यावा अशी मागणी नितीन लढ्ढा यांनी केली. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आमदारांनी पाठपुरावा केल्यास मनपाच्या खर्चाची बचत होईल.शहरासाठी एकच सफाईचा ठेका११ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाºयांनी शहरात प्रभागनिहाय चार सफाईचे ठेके देण्याचा ठराव केला होता. मात्र, शहरासाठी एकच सफाईचा ठेका असावा यासाठी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक आग्रही असल्याने या महासभेत गेल्या महासभेच्या इतिवृत्तात बदल करून संपूर्ण शहरासाठी एकच सफाईचा ठेका देण्याचा ठराव करण्यात आला.आधी सुविधा द्या, मगच करवाढ करा- नितीन लढ्ढाप्रशासनाकडून हा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तीव्र आक्षेप घेत. शहरातील नागरिक आधीच सफाईच्या नावावर २ टक्के कर भरत आहेत. त्या बदल्यात नागरिकांना मनपा प्रशासनााकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे लढ्ढा म्हणाले. त्यावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी हा कर मनपाकडून नाही तर शासनाकडून असल्याचे सांगितल. शासनाकडून हा कर लावण्यात येत असला तरी या प्रस्तावाला सभेची मंजुरी योग्य नसल्याचे लढ्ढा म्हणाले.समांतर रस्ते : पाईप-लाईन स्थलांतरासाठी ३ कोटीशहरातील महामार्गलगत होणाºया समांतर रस्त्याच्या कामासाठी अडसर ठरणाºया मनपा पाणी पुरवठ्याच्या पाईप-लाईन स्थलांतराच्या ३ कोटी रुपयांच्या खर्चास महासभेने बहुमताने मंजुरी दिली. आधी पाईप-लाईनसाठी २ मीटर खोदकाम करावे लागणार होते. त्यामुळे मनपाने पाईप-लाईन स्थलांतरासाठी आधी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र,आता पाईप-लाईनसाठी ३ मीटर खोदकाम करण्यात येणार असून, समांतर रस्ते व महामार्गाच्या मध्यभागी ही पाईप-लाईन स्थलांतरित करण्यात येणार असल्याने १ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय मनपाने घेतला असल्याची माहिती भाजपाचे गटनेते भगत बालानी यांनी सभेत दिली.निर्बिजीकरणासाठी दीड कोटी मंजूरशहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया मनपाकडून करण्यात येणार आहे. यासाठी शहरात डॉगरुम तयार करण्यात येणार आहे. तसेच काही डॉग व्हॅन देखील मनपाला खरेदी कराव्या लागणार आहेत अ‍ॅनीमल वेलफेअर आॅफ इंंडियाशी संलग्नित असलेल्या एका संस्थेवर ही जबाबदारी असेल. दिड कोटी रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली.भाजपाकडून आमदारांना अडचणीत आणण्याचे षडयंत्रमनपाने नागरिकांना चांगल्याप्रकारे आरोग्याच्या सुविधा देणे गरजेचे असून, त्या सुविधा दिल्या नंतरच त्यांच्याकडून कर वसुली करण्याचा सल्ला लढ्ढा यांनी दिला. तसेच शुल्क वाढवले तर भाजपाच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असेही लढ्ढा म्हणाले. हा ठराव मंजूर करून आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र सत्ताधाºयांकडून करण्यात येत असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. त्यांच्या या आरोपाने सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Jalgaonजळगाव