शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपांकडे दुर्लक्ष करीत जळगाव जिल्हा बँकेकडून अध्यक्षांच्या कारखान्याला ५५ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:26 IST

आमदार चंद्रकांत पाटील यांना उत्तर न देता उपाध्यक्षांचा पत्रकारांवरच रोष

जळगाव : जिल्हा बँकेकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहीणी खडसे यांची भागीदारी असलेल्या खाजगी साखर कारखान्यास सत्तेचा दुरूपयोग करून किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले असून या गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली. असे असताना शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत या कारखान्यास मागणी केलेल्या ८१ कोटी ९६ लाखांपैकी ५५ कोटींचे कर्ज देण्यास मंजूरी देण्यात आली.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहीणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यास बँकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, गुलाबराव देवकर, संजय पवार, तिलोत्तमा पाटील यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व २० विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळेत सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.उपाध्यक्षांचा पत्रकारांवरच रोषआमदार चंद्रकांत पाटील यांनी बँकेच्या अध्यक्षांच्याच कारखान्यास किंमतीपेक्षा तिप्पटीचे कर्ज कसे मंजूर होते? सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केल्याने शुक्रवारी होणाºया संचालक मंडळाच्या सभेत याबाबत काय निर्णय होतो? याबाबत उत्सुकता होती. मात्र बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळत दरवेळी बँकेच्या हिताच्या विरोधातील मुद्यातच पत्रकारांना रस का असतो? असा आरोप केला. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोप केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावरही त्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही. बँकेच्या हिताचेच निर्णय घेतले असल्याचे सांगितले. बँकेच्या हिताचे विषय करायचे की नाहीत? मुक्ताई कारखान्याच्या कर्जाचा विषय हा बँकेच्या हिताचा विषय आहे. कारण मुक्ताई कारखान्याला दिलेले कर्ज वगळता अन्य सहकारी संस्था, कारखान्यांना दिलेले कर्ज थकीत झाले आहे. एकमेव या कारखान्याकडूनच नियमित परतफेड केली जात असल्याचे सांगितले. त्यासाठी ९० कोटींच्या आसपास किंमत असलेला कारखाना व ५५ कोटींची साखर तारण ठेवली असल्याचे सांगितले.आरोप राजकीय द्वेषापोटी-अ‍ॅड.रोहीणी खडसेचंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप हे राजकीय द्वेषापोटी केले असल्याची प्रतिक्रिया बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहीणी खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. बँकेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी लोकांनी आम्हाला इथे निवडून पाठविले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर द्यावे, असे वाटत नाही. तसेच त्यांना खरच सहकारी कारखानदारी जिवंत रहावी, असे वाटत असेल तर ते सत्तेत आहेत. मधुकर सहकारी साखर कारखान्याला मागच्या हंगामापासूनच शासनाची थकहमी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ती मिळवून द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.मसाकालाही २२ लाख मंजूरसहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मधुकर सहकारी साखर कारखान्यास थकीत वीज बिलाचा भरणा करण्यासाठी २२ लाख रूपयांची मागणी मंजूर करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव