शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

जळगावात प्रभाग क्र. ११ मध्ये माजी महापौरांसह ५ नगरसेवक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 11:39 IST

चारही जागांसाठी होणार चुरशीची लढत

ठळक मुद्दे लढत चुरशीची ठरणारशहराचे लक्ष

जळगाव : प्रभाग क्र.११ मध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह ५ विद्यमान नगरसेवक तसेच एक नगरसेवक पत्नी असे दिग्गज एकमेकांविरोधात रिंगणात उतरले असल्याने या प्रभागातील चारही जागांसाठी चुरशीच्या लढती होणार आहेत.प्रभाग क्र.११ हा मनसेचे नगरसेवक संतोष पाटील व पार्वताबाई भिल यांच्या प्रभाग क्र.१६ ला नितीन नन्नवरे व सिंधुताई कोल्हे यांच्या प्रभाग १८चा काही भाग व महापौर ललित कोल्हे व मनसेच्याच लिना पवार यांच्या प्रभाग १७ चा काही भाग जोडून तयार झाला आहे. मनसेचा प्रभाव असलेले दोन प्रभाग फुटले आहेत. त्यांचे भाग या प्रभागात जोडले गेलेले आहेत.आता मागील निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेले ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे, संतोष पाटील, पार्वताबाई दामू भिल या नगरसेवकांनी आता भाजपात प्रवेश केला आहे.संतोष पाटील हे वगळता उर्वरित तिघांनी स्वत:च पुन्हा या प्रभागातून उमेदवारी मिळविली आहे. तर संतोष पाटील यांच्या पत्नी उषा संतोष पाटील यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे.दरम्यान या प्रभागातील अपक्ष उमेदवारांबाबत मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्यापही माहिती मिळालेली नाही.या प्रभागात एकमेकाविरोधात सर्वच प्रभावी उमेदवार उतरल्याने या सर्वच लढती चांगल्याच रंगणार असून या प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागातील लढतींकडे लागले आहे.११-ब मध्ये भाजपाच्या उषा संतोष पाटील व शिवसेनेच्या हर्षाली प्रदीप वराड यांच्या लढत रंगणार आहे.अशी होणार लढत११-अ च्या जागेसाठी भाजपाच्या पार्वताबाई दामू भिल यांच्याविरोधात चार वेळा नगरसेवकपदी निवडून आलेले व आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले श्यामकांत बळीराम सोनवणे हे शिवसेनेकडून तर राष्टÑवादीकडून सायरा तडवी रिंगणात आहेत.११-क मध्ये भाजपाच्या सिंधुताई विजय कोल्हे, शिवसेनेच्या लिना राम पवार यांच्यात लढत आहे. लिना पवार या देखील विद्यमान नगरसेवक असून मागील निवडणुकीत मनसेकडूनच निवडून आल्या होत्या. मात्र आता शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. मागील निवडणुकीत सोबत रणनिती आखून निवडणूक लढविणारेच आता एकमेकांविरोधात रिंगणात उभे ठाकल्याने ही लढत चांगलीच रंगणार आहे. राम पवार यांचाही जनसंपर्क दांडगा असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे.सुरेशदादा जैन यांच्याच खाविआच्या पाठिंब्यावर महापौरपद भूषविलेल्या ललित विजय कोल्हे हे भाजपाकडून या प्रभागात ११-ड च्या जागेसाठी रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेचे बुधा दला हटकर, काँग्रेसचे शिवराम पाटील रिंगणात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव