शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: जळगावच्या विद्यापीठाने करून दाखवले !

By अमित महाबळ | Updated: October 18, 2023 17:39 IST

Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे.

- अमित महाबळ जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी परीक्षा विभागाची कार्यपद्धती आणि तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा या विषयांवरील बैठकीत दिली. मंगळवारी विद्यापीठात ही बैठक घेण्यात आली. 

अधिसभा सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा.योगेश पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माजी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. प्रा. योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक‍ कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील व प्रा. सुरेखा पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. 

तक्रारी महाविद्यालय स्तरावर सोडवाप्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालासंदर्भातील तक्रारी विद्यापीठात प्राप्त होण्यापूर्वी त्या महाविद्यालय स्तरावर सोडविल्या जाव्यात. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज पडू नये. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तासिकांना नियमित उपस्थिती द्यावी. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची गरज भासणार नाही. यासाठी विद्यापीठाच्या अभियानाला संघटनांनी व सर्व घटकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

विधी शाखेचा पॅटर्न सुधारित कराविद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विधी शाखेचा पॅटर्न सुधारित करावा, प्राध्यापकांनी आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी याचे मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचा तक्रारींचा निपटारा त्वरीत व्हावा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात यासारख्या विविध मागण्या केल्या.

टॅग्स :universityविद्यापीठJalgaonजळगावEducationशिक्षण