शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: विद्यापीठाचे बजेट मांडले, तूट दिसली; पण आचारसंहितेमुळे योजनांवर चर्चा नाही  

By अमित महाबळ | Updated: March 23, 2024 19:37 IST

Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक (बजेट) शनिवारी (दि. २३) अधिसभेत सादर करण्यात आले. २८९.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभा सदस्यांनी मंजूर केले.

- अमित महाबळजळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक (बजेट) शनिवारी (दि. २३) अधिसभेत सादर करण्यात आले. २८९.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभा सदस्यांनी मंजूर केले. यात १९.५५ कोटी रुपये तूट दाखविण्यात आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विद्यार्थी हिताच्या योजनांची घोषणा व त्यावरील चर्चा टाळण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी होते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील मंचावर उपस्थित होते. अर्थसंकल्प समितीचे अध्यक्ष ॲड. अमोल पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केवळ जमा-खर्चाची आकडेवारी मांडण्यात आली. मात्र, त्यावरील तरतुदींची घोषणा करण्यात आली नाही. दोन सदस्यांनी कपात सूचना मांडली होती. मात्र, नंतर त्या मागे घेण्यात आल्या. सदस्यांनी विद्यार्थी हिताच्या योजनांबाबत विचारणा केली असता, आचारसंहिता लागू असल्याने त्यावर या बैठकीत माहिती देणे, चर्चा करणे शक्य नसल्याचे सभेच्या अध्यक्षांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या बैठकीत माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांचा समावेश अंदाजपत्रकात केलेला आहे. दि. १ एप्रिलपासून त्यावर काम सुरू होईल. परंतु आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता माहिती देता नसल्याचेही ॲड. अमोल पाटील यांनी सांगितले.

...अन् कपात सूचना मागे घेतलीयंदाचा अर्थसंकल्प २८९.१६ कोटी रुपये एवढा असून, तूट १९.५५ कोटी रुपये एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत तूट ४.७५ कोटींनी कमी झाली आहे. या अर्थसंकल्पात परीक्षणासाठी १९६.४६ कोटी, योजनांतर्गत विकासासाठी ४३.५१ कोटी आणि विशेष कार्यक्रम-योजनांसाठी ४९.१९ कोटींची तरतूद आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अमोल मराठे व प्रा. एकनाथ नेहेते यांनी दिलेल्या कपात सूचनेअंती चर्चा झाल्यानंतर त्यांनी कपात सूचना मागे घेतली. अर्थसंकल्पावर सदस्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर सभागृहाने अर्थसंकल्पाला मान्यता दिली. त्याआधी प्रश्नोत्तरांचा तास झाला. या तासात दीपक पाटील, अमोल मराठे, दिनेश चव्हाण व दिनेश खरात यांच्या प्रश्नांना सीए रवींद्र पाटील, अमोल पाटील, प्रा. अनिल डोंगरे यांनी उत्तरे दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव