आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - बळीराम पेठेत बाजारासाठी आलेल्या प्रशांत वासुदेव वाणी (वय ३४, रा.बळीराम पेठ, जळगाव) यांची दुचाकी लांबविणाºया रोहीत पंडित निदाने (वय १९) व अल्पवयीन मुलगा दोन्ही रा.गुरुनानक नगर, जळगाव या दोघांना शनी पेठ पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह अवघ्या चार तासातच अटक केली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत वाणी हे मंगळवारी दुपारी दोन वाजता बळीराम पेठेत बाजारासाठी आले होते. ओक मंगल कार्यालयसमोर त्यांनी दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.टी.३५१९) पार्कींग केली. बाजार आटोपून आल्यावर दुचाकी गायब झाली होती. सर्वत्र शोधाशोध करुनही दुचाकीची शोध न लागल्याने त्यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.रेल्वे स्टेशन परिसरात लावला सापळागुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या खबºयामार्फत माहिती काढायला सुरुवात केली. गजानन बडगुजर यांना दुचाकी चोरटे रेल्वे स्टेशनकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी हेडकॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील, गजानन बडगुजर, अनिल धांडे व अभीजीत सैंदाणे यांच्या पथकाला स्टेशन परिसरात सापळा लावण्याचे आदेश दिले. या पथकाने चारही बाजूंनी साध्या वेशात सापळा लावला असता पोलीस चौकीजवळ रोहीत व अल्पवयीन मुलगा असे दोघं जण दुचाकी घेऊन येताच त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील रोहीत याच्यावर २०१३ मध्येही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे.चावी विसरल्याने चोरी झाली दुचाकीप्रशांत वाणी यांनी दुचाकी पार्कींग करताना चावी दुचाकीला तशीच राहू दिली. त्यामुळे चोरट्यांना आयती संधी मिळाली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकी लांबविली.
जळगावात दुचाकी चोरणाऱ्यांना चार तासातच पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:22 IST
गुन्हा उघड
जळगावात दुचाकी चोरणाऱ्यांना चार तासातच पकडले
ठळक मुद्देदुचाकी जप्तदोघांना अटक