शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत प्रकृती खालावलेल्या मणिपूरच्या नृत्य शिक्षकावर जळगावात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:07 IST

लातूर येथून राष्ट्रीय बाल महोत्सवाहून परतत असताना ओढवले संकट

जळगाव : लातूर येथे झालेल्या राष्ट्रीय बाल महोत्सवातून विद्यार्थ्यांसह मणिपूरकडे पतरणारे मोहेंद्र वांगक्षेम मयूम (५६, रा. फाऊपाल) या मणिपूर येथील नृत्य शिक्षकाची रेल्वेत अचानक प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जळगावात उपचार करण्यात आले. ते या संकटातून बाहेर पडले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मयूम यांच्यावर तातडीचे उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.लातूर येथे झालेल्या राष्ट्रीय बाल महोत्सवात देशातील विविध भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात मणिपूर येथील शाळेचाही सहभाग होता. मणिपूर येथून १७ विद्यार्थ्यांसह नृत्य शिक्षक मोहेंद्र मयूम, दोन शिक्षिका व एक सहकारी आलेले होते. हा महोत्सव आटोपल्यानंतर ही मंडळी पुणे येथून आझाद हिंद एक्सप्रेसने हावडा येथे जाण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान मयूम यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) अचानक वाढला व उलट्याही झाल्या. त्यामुळे शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मयूम यांना घेऊन त्यांचे सहकारी सुरजित मिथाई हे जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले व मयूम यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तातडीच्या उपचारामुळे मयूम यांच्या प्र्रकृतीत सुधारणा झाली.दरम्यान, सोबत असलेल्या १७ विद्यार्थ्यांना शिक्षिकांसोबत हावडाकडे रवाना करण्यात आले.पंजाब दौरा राहून गेलापंजाब येथेही एका कार्यक्रमासाठी मयूम यांना जायचे होते. त्यासाठी ते इम्फाळ येथे उतरणार होते व तेथून ते पंजाबला जाणार होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथे उतरावे लागले व त्यांचा पंजाब दौरा राहून गेला, अशी माहिती त्यांच्यासोबत असलेले सुरजित मिथाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अधिकारी लक्ष ठेवूनमोहेंद्र मयूम यांना रुग्णालयात दाखल करताच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी डॉक्टरांना तसेच आवश्यक त्या मदतीसाठी प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे यांना सूचना दिल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत कांते यांनी तातडीने उपचार केले तर लेखापाल योगेश पाटील, जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांनी मदत केली.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव