- राकेश शिंदे जळगाव - पारोळानजीक असलेल्या भोकरबारी धरणात दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोन सख्खे भाऊ आहेत. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत.हसन रजा न्याज मोहम्मद न्याज (१६), इमाम रजा न्याज मोहम्मद न्याज (१४, दोघे रा. पारोळा) आणि आवेस रजा शाह मोहम्मद (१७, रा. मालेगाव) अशी या मृतांची नावे आहेत. पारोळानजीक भोकरबारी धरणात हसनसह पाच जण पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. यातील हसन आणि इमाम हे सख्खे भाऊ आहेत. तर आवेस हा दोन दिवसापूर्वीच मालेगावहून पारोळ्यातील नातेवाईकांकडे आला होता.
Jalgaon: सख्ख्या भावांसह तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:06 IST