शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Jalgaon: ...तर ही वेळ आलीच नसती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:27 IST

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ ...

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसंच ते करतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडला. यानिमित्ताने माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत  काळे झेंडे दाखविले. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की  मोदींमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ते पंतप्रधान राहिले तर... अनेक घोटाळे बाहेर येतील, हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले आहेत.

केळी विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खान्देशसाठी आयुक्त कार्यालय जळगावमध्ये केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

‘तर तुम्ही हाताखाली का काम केले?’मी नालायक होतो, तर ४० वर्षे तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले, असा सवाल आ. एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालिशपणा आहे. आरोपांपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्या, असा सल्ला त्यांनी दिला. 

गर्दीसाठी धमकी - जयंत पाटीलnकार्यक्रमासाठी गर्दी व्हावी या हेतूने रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करून चार महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा धमकीवजा संदेश पसरवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे