शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: आदेश मिळाला हो..., आता बनवा की गोडधोड..!  -

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:08 IST

Jalgaon: दिवाळी नसली, तरी दिवाळीचा उत्साह आहे. एक हजारपेक्षा अधिक घरांमध्ये गोडधोडाचे जेवण बनणार आहे. कारण, गेली अनेक वर्षे ते ज्याची वाट पाहत होते, ते प्रत्यक्षात समोर आले आहे.

अमित महाबळजळगाव -  दिवाळी नसली, तरी दिवाळीचा उत्साह आहे. एक हजारपेक्षा अधिक घरांमध्ये गोडधोडाचे जेवण बनणार आहे. कारण, गेली अनेक वर्षे ते ज्याची वाट पाहत होते, ते प्रत्यक्षात समोर आले आहे. जिल्ह्यात १३१ शाळांमधील एक हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान लागू झाले आहे. याचा लाभ त्यांना ३१ मार्चपूर्वी मिळेल. मंगळवारी, या आदेशाचे वाटप शाळांना करण्यात आले.

गेली अनेक वर्षे शाळांच्या अनुदानाचा विषय प्रलंबित होता. गेली १७ वर्षे राज्यातील अनेक शिक्षक अनुदान नसलेल्या शाळांमधून तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांना अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय गेल्या वर्षी सरकारने घेतला आणि फेब्रुवारी महिन्यात आदेश काढला. ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यासाठी शाळांकडून संचमान्यता मागविण्यात आली होती. त्यांच्या पडताळणीचे काम शिक्षण विभागाने पूर्ण केले आहे. जि.प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या हस्ते प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना अनुदान मान्यतेचे आदेश वितरित करण्यात आले. यावेळी वेतन पथक अधीक्षक शर्मा, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख, अधीक्षक किशोर वानखेडे, साधना लोखंडे, पुष्पा पाटील, जी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

छाननीचे काम अजूनही सुरूअद्यापही काही शाळांच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ततेचे काम सुरू आहे. ते ३१ मार्च अखेर पूर्ण केले जाईल. अनुदान वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी खर्ची घालायचे आहे. बुधवारी, शालार्थ आयडीचे शिबिर मू. जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. शालार्थ आयडी मिळालेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपूर्वी पगार मिळेल. अनुदान पात्र शाळाअनुदान - शाळा - शिक्षक२० टक्के - ६८ - ३८८४० टक्के - १७ - ९८६० टक्के - ४८ - ५४५

टॅग्स :Jalgaonजळगाव