शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : ...तर वृद्धाचे वाचले असते प्राण! भरधाव कारने वृद्धाला उडविले

By सागर दुबे | Updated: April 5, 2023 15:01 IST

वृद्धाला वाचविण्याचा प्रयत्न पण...

जळगाव : जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नेक्सा शोरूमसमोर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या राजकुमार सोमोमल धामेचा (६५, रा.रा. सम्राट कॉलनी) या वृद्धाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे वृध्दाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी वृध्द व्यक्ती ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असता, त्यांना वाचविण्यासाठी काही तरूणांनी रूग्णवाहिकांना व पोलिसांना संपर्क साधला. पण, मदत उशिराने मिळाल्यामुळे वृद्धाचा रूग्णालयात मृत्यू झाला.

राजकुमार धामेचा हे परिवारासह सम्राट कॉलनी येथे वास्तव्याला होते. गेल्या १० वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. पण, प्रकृती बरी नसल्यामुळे रात्री ते घरी येण्यासाठी निघाले. जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नेक्सा शोरूमजवळ ते रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी मागून अज्ञात कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.कामगार तरूणांची मदतीसाठी धाव...आर.एल.चौफुलीजवळील सुप्रिम कंपनीमधील कामगार नीलेश नारखेडे, वैभव पाटील, उमेश चौधरी, संदीप सोनार हे रात्री ११ वाजेच्या सुमारास ड्युटी संपवून कंपनीतून बाहेर निघाले. त्यावेळी त्यांना नेक्सा शोरूमजवळ रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध व्यक्ती दिसून आली. वृद्धाला वाचविण्यासाठी त्यांनी तत्काळ रूग्णवाहिकेला आणि पोलिसांना संपर्क केला. मात्र, अर्धा पाऊण तास उलटूनही कुठली मदत मिळत नसल्यामुळे अखेर तरूणांनी रस्त्यावरील वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. नंतर एक वाहन थांबवून वृद्धाला जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ उपचाराला सुरूवात केली. मात्र, त्याचवेळी वृद्धाची प्राणज्योत मालवली. जर लवकर मदत मिळाली असती, वृद्धाचे प्राण वाचले असते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ५ विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अल्ताफ पठाण आणि सिध्देश्वर डापकर करीत आहे

टॅग्स :Jalgaonजळगाव