शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

By ajay.patil | Updated: September 8, 2022 19:22 IST

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार.

यंदा जास्त तापमान व कमी तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना एकूण ३७५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, ही रक्कम खात्यात वर्ग झाल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेतली आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम परस्पर पीक विम्याच्या रकमेतून सेव्हींग अकांऊटमधून थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना साधी विचारणादेखील होत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील बँकांना ही रक्कम शेतकऱ्यांना न विचारता किंवा त्यांची परवानगी न घेता कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही या प्रकरणी दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

कर्ज वसूल करण्याची पद्धत सोडून मनमानी कारभारज्या शेतकऱ्यांकडे बँकांची कर्जाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्याबाबत बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांकडून ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना नोटीस दिली जाऊ शकते, किंवा शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बोझा बसविला जावू शकतो. मात्र, शेतकऱ्यांच्या बचत खात्यातील रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्याची तरतूद नाही. विशेष म्हणजे हा नियमच नाही, त्यातच जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ही रक्कम तर परस्पर वर्ग केलीच जात आहे. मात्र, याबाबत शेतकऱ्यांना विचारले देखील जात नसून, कोणतीही माहिती देखील शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची माहिती जळगाव तालुक्यातील नांद्रा, गाढोदा येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

नुकसानभरपाईच्या रकमेतून वर्ग करणे नियमबाह्य - खासदार उन्मेष पाटीलशेतकऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम ही शेतकऱ्यांना बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम नाही. तर ही रक्कम शेतकऱ्यांनी लावलेल्या केळीचे जास्त व कमी तापमानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईपोटी मिळालेली पीक विम्याची रक्कम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हा मोबदला आहे. मात्र, त्या रकमेतून शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून ती रक्कम कर्ज खात्यात टाकणे हे नियमबाह्य असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देखील सूचना दिल्या असून, अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही ही रक्कम परस्पर वर्ग करू नये, अशा सूचना दिल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम वर्ग केली जात नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशाप्रकारे रक्कम वर्ग केली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँका जिल्हाधिकाऱ्यांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे रक्कम वर्ग केली जात नाही.जितेंद्र देशमुख,कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव