शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय, सत्यजित तांबेंनी सरकारला दिला "हा" ॲक्शन प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 19:07 IST

Satyajit Tambe: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय बिले कॅशलेस करायला हवीत, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केली.

- प्रशांत भदाणेजळगावसरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय बिले कॅशलेस करायला हवीत, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केलीये. सत्यजित तांबे यांनी सोमवारी जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्यजित तांबे पुढे म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली जाते. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षणाधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. स्वतः शिक्षण आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांची यादी देऊन त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. ही सारी परिस्थिती पाहता महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा खासगी मेडिक्लेम कंपन्यांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले कॅशलेस व्हावीत, असं ते म्हणाले. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हायला हवी, असंही सत्यजित तांबे शेवटी म्हणाले.

जिल्हा परिषदेत घेतली बैठकआमदार सत्यजित तांबे यांनी जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिले, पेन्शनर्स शिक्षकांची ग्रॅज्युएटी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या सर्व प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढू असं, आश्वासन यावेळी तांबे यांनी शिक्षकांना दिलं. राज्य सरकारकडे अडकलेला निधी व अनुदानाच्या बाबतीतही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेJalgaonजळगाव