शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जळगावचे तापमान पोहचले ४७ अंशांवर, आगामी दोन दिवस झळा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:03 IST

उष्ण वाऱ्यांनी अंगाची लाही -लाही

जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी अधिकृत हवामान केंद्रावर ४५़ ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर खाजगी संस्थांनी पारा थेट ४७ अंशावर गेल्याचा दावा केला आहे. उन्हाच्या झळांमुळे नागरिक बेजार आणि घामाघूम होत आहेत. दुपारी वर्दळ असणारे अनेक रस्ते निमर्नुष्य होत आहेत.जिल्हाभरात अनेक ठिकाणी ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती वेलनेस वेदर फाउंडेशनचे निलेश गोरे यांनी दिली आहे़ भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या वेबसाईटवर ४५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद होती़ काही साईटवर ४८ तापमान असल्याच्या पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर फिरत होत्या़ दरम्यान, आगामी दोन दिवस जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे़काय आहे कारणेमार्च ते २१ जून या कालावधीत सूर्याचा विषववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत प्रवास होत असतो.या कालावधीत सूर्याची किरणे बराच काळ लंबरूप पडत असल्याने तापमान वाढते व त्यामुळे उत्तर उष्णकटीबंधीय पट्टयात तीव्र उन्हाळा असतो़ सूर्याच्या उष्णतेने विषववृत्तावरील हवा वर जाते़ त्या हवेचे संक्रमण उत्तरेकडे हवेच्या वरच्या भागातून सुरू होते़ उत्तरेकडे जाताना हवा थंड होते़ भारताच्या मध्यभागावर आल्यावर ही हवा थंड होऊन खाली येऊ लागते़ खाली येताना तिचे तापमान वाढते, अशा स्थितीत ढगांची निर्मिती होेऊ शकत नाही़आकाश निरभ्र राहते व सूर्यकिरणे विनाअडथळा जमिनीपर्यत पोहोचतात, यामुळे तापमान वाढते़ या कालावधीत बाष्पयुक्त वाऱ्यांचा अभाव राहिल्यामुळे देखील कमाल तापमान वाढत असते.तीन दिवस चटक्यांचे२७ ते २९ एप्रिल दरम्यान जळगावसह अन्य काही शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याच्या इशारा देण्यात आला होता़ त्यानुसार शनिवारी जळगाव शहरवासींयाना ही उष्णतेची लाट अनुभवली़ आगामी दोन दिवस ही लाट कायम राहणार आहे़लग्नसराईच्या धामधूमीत जरा सांभाळूनदोन दिवस लग्नासराईचे होते़ रविावारीही लग्नाची मोठी तिथ असल्याने जिल्हाभरात लग्नसराईची धामधूम असणार आहे़ ़अशा स्थितीत उष्णतेचा परिणाम बघता लग्न सोहळ्यांमध्ये वºहाडींनी काळजी घ्यावी, अचानक उन्हातून थंड वातावरणात किंवा अचानक थंड वातावरणातून कडक उन्हात गेल्याने उन्हाचा फटका बसण्याची शक्यता अधिक असल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी काळजी घ्यावी, असेही तज्ञांकडून सांगण्यात येत आहे़काय काळजी घ्यालभरपूूर पाणी पिणे, सावलीत राहणे, सुती आणि सैल कपडे घालणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे न करणे, कॉफी, दारू यांचे सेवन न करणे, अशा सोपी बाबींमधून उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो़उन्हामुळे डोळ््यांचा त्रास वाढलावाढत्या उन्हाच्या तडाख्यात अतिनिल किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होण्याची शक्यता असून त्यामुळे डोळा दुखणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या प्रामुख्याने जाणवू लागल्या आहेत. तसेच पापण्यांच्या त्वचेसही ‘सनबर्न’ होऊ शकते, डोळ््यांंना खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळत असल्याचे सध्या चित्र आहे. ४ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना जास्त अ‍ॅलर्जी होत आहे. यासाठी दक्षता घेत उन्हाळ््यात घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल, स्कार्फ व सनग्लास वापरावा, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिला आहे.अकोल्याचे तापमान सर्वाधिक ४६ अंशावर गेले होते, अकोला, बुलडाण्यासारखीच परिस्थिती जवळपास जळगावची असते़ भारत हा अन्य देशांपेक्षा उष्ण देश असल्याचेही मध्यंतरी नमूद करण्यात आले होते़ हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आहे़- डॉ़ रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव