जळगाव : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्यातर्फे ३ ते ७ सप्टेंबर यादरम्यान बुलढाणा येथे राज्य अजिंक्यपद ९० व्या वरिष्ठ मुले स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला. या संघाचे प्रशिक्षक म्हणून नीलेश बाविस्कर, तर व्यवस्थापक म्हणून विशाल सोनवणे काम पाहत आहेत. या संघात प्रथमेश आव्हाड, रितेश मोरे, असिफ तडवी, हर्षल पांढरे, टहेमटन जळगाववाला यांचा समावेश करण्यात आला आहे.
निवड झालेल्या खेळाडूंचे एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील यांनी कौतुक केले.
फोटो कॅप्शन:- निवड झालेल्या संघासोबत विकास पाटील, नीलेश बाविस्कर, सचिन महाजन, नीलेश जोशी व निवड झालेले खेळाडू.