शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील तरसोद येथे दोन गटात हाणामारी, १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:20 IST

दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांतता

ठळक मुद्देहाणामारीत एकाचे डोके फुटले क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद

आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. ११ - जळगाव तालुक्यातील तरसोद येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद उफाळून आला, त्यावरून दगडफेक करीत काठ्यांचा वापर करून हाणामारी झाली. त्यात एका गटाच्या ८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर दुस-या गटाच्या ३ जणांवर परस्परविरोधी गुन्हा नशिराबाद पोलिसात दाखल आहे. हाणामारीत एकाचे डोके फुटले असून जबर दुखापत झाली. एकूण दोन जण जखमी असून पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तरसोद येथे बसस्थानक चौकात घडली. गावात तणावपूर्ण शांतता आहे.अमोल गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल रामेश्वर राजपूत व अमोल पाटील यांच्यात ९ मार्चला क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यावसान शनिवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक वाद उफाळून आला. माझ्या समाजाच्या लोकांसोबत राहतो यावरून वादाची ठिणगी पडल्याने सांगण्यात येते. राहुलने अमोल पाटील याच्या कानात मारली. दगडफेक करून दहशत निर्माण केली. लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले. त्यात गणेश विनायक पाटील यांचे डोक्यास जबर दुखापत झाली तर अमोल गणेश पाटील यांच्या हातास दुखापत झाली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.अमोश गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल रामेश्वर राजपूत (२४), हेमंत दिनकर राजपूत (३४), विनोद सुभाष राजपू (२९), सचिन सुनील राजपूत (२३), सागर सुनील राजपूत (१९), रामेश्वर मोतीलाल राजपूत (४२), मनोज सुनील राजपूत (२०), संतोष मोतीलाल राजपूत (४०) सर्व रा.तरसोद यांच्यावरून गुन्हा दाखल असून सर्वांना अटक केली आहे.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, उपनिरीक्षक अशोक खरात, चेतन पाटील, गोकुळ तायड, युनूस शेख, गुलाब माळी, सायबु तडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली.दुसºया गटात दिलेल्या फिर्यादीत सोन्या उर्फ अमोल गणेश पाटील, कैलास लटकन पाटील (४५), रावसाहेब उर्फ वसंता अशोक पाटील (३१) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. माझ्याशी विवाह कर असे म्हणत अश्लील वर्तन केले. मारहाण केली अशी फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा