शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:58 IST

न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला.

ठळक मुद्देन्यायालयात वेबसाइटचे लोकार्पणजलद गतीने निकाली निघतील खटलेपारदर्शकता यावी यासाठी सुविधा

जळगाव : न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला. ई-प्रणालीमुळे समन्स व वारंट बजावणीची आता खऱ्या अर्थाने पोलिसांची कसोटी लागणार आहे.या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर, न्या.ज्योती दरेकर, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन आदी उपस्थित होते.न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील समन्स याआधी संबंधित पोलीस स्टेशनला बजाविण्यात येत असे. तेथून पोलिसांमार्फत संबंधिताला ते समन्स व वॉरंट मिळेपर्यंत अनेक अडथळे निर्माण होत होते. हे अडथळे दूर करून त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंदा सानप व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून आता ई-प्रणाली सुरू करण्यात आली. या नव्या पद्धतीने आता समन्स व वॉरंट थेट संबंधित पोलीस स्टेशनला आॅनलाइन जाईल. तेथून पोलिसांमार्फत ते व्यक्तीला बजाविण्यात येणार आहे.न्या.सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ई-प्रणालीद्वारे समन्स व वॉरंट बजाविण्याचा प्रयोग यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात आला, परंतु पोलीस कर्मचाºयांकडून त्याला योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्याठिकाणी हा प्रयोग बारगळला. समन्स पोलिसांकडून योग्य वेळेत बजाविला जात नसल्याने संबंधिताला तो मिळत नसल्याने साक्षीदारांना न्यायालयात साक्ष देता येत नव्हती. या सर्व प्रकारामुळे न्यायालयाला ती साक्ष तहकूब ठेवावी लागत असल्याचे ते यावेळी म्हणाले. परंतु आता या सर्व प्रकरांना आळा बसणार असून प्रकरणांचा जलद गतीने निकाल लागण्यास मदत होणार आहे. ई-प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगावonlineऑनलाइन