शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विद्यार्थिनीने बारावीच्या पेपर देऊन पित्याला दिला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:27 IST

दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर

ठळक मुद्देसाध्वींसोबत विहार करीत असताना संजय संचेती यांनी घेतला अखेरचा श्वास दोन्ही मुलींनी निर्माण केला आदर्श

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - अवघ्या तीन तासांवर बारावीची परीक्षा देण्याची वेळ आली असताना पित्याचा अचानक मृत्यू होऊन दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आयोध्यानगरातील संजना संजय संचेती या विद्यार्थिनीने दु:खावर मात करीत मोठ्या धीराने बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर संजनाने आपली बहिण अमृतासह पित्याच्या पार्थिवाला खांदा देत दोघींनी मुखाग्नीही दिला. मन हेलावून टाकणारा हा प्रसंग बुधवारी संचेती कुटुंबावर ओढावला व सर्वांनी याबाबत हळहळ व्यक्त करीत या मुलींच्या धाडसाचे कौतुक केले.व्यापारी संजय शांतीलाल संचेती (४९) हे पत्नी, दोन मुली, आई, भाऊ यांच्यासह आयोध्यानगरमध्ये रहात. त्यांची धाकटी मुलगी संजना हिची बारावीची परीक्षा सुरू असून तिचा आज सकाळी ११ वाजता रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.याच दरम्यान बुधवारी सकाळी संजय संचेती हे भुसावळ - जळगाव दरम्यान असलेल्या लोढा नगर येथून जैन साध्वी इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या सोबत जळगावकडे विहार करीत होते. लोढा नगरपासून एक-दीड कि.मी अंतरावर आले असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास संजय संचेती यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. त्या वेळी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.इकडे घरी धाकटी मुलगी बारावीच्या परीक्षेला जाण्याची तयारी करीत होती तेवढ्यात पित्याच्या मृत्यूची वार्ता घरी येऊन धडकली. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांसह परीक्षार्थी संजना हिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला. घरात एकच अकांत सुरू होता. या दुु:खद घटनेने अवघ्या तीन तासांवर आलेली परीक्षा देण्याचाही धीर काही क्षण हरविला. त्यावेळी इतरांनी संजनाचे सांत्वन केले व तीदेखील मोठ्या धीराने उभी राहिली आणि पिताच्याचे पार्थिव घरात ठेवून व आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेली.मुलींनीच दिला खांदादुपारी दोन वाजता परीक्षा संपल्यानंतर घरी येऊन संजना व तिची मोठी बहीण अमृता यांनी पित्याची सेवा केली व पार्थिवाला खांदा दिला. पुढे वैकुंठधाम येथे अंत्यायात्रा पोहचल्यानंतर तेथे दोन्ही मुलींनी पित्याला मुखाग्नी देत अखेरचा निरोप दिला. या वेळी संपूर्ण वातावरण भावूक होऊन उपस्थितांचे डोळे पाणावले होते.साध्वींना आहार देण्याची इच्छा राहिली अपूर्णजैनाचार्य हस्तीमलजी म.सा. यांच्या शिष्या इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ या बुधवारी जळगावातील जैन भवनकडे विहार करीत असल्याने या दरम्यान असलेल्या आयोध्यानगरातील आपल्या घरी त्यांना आणून आहार देण्यासाठी सकाळपासून संजय संचेती हे साध्वीजींसोबत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने आहार देण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.संचेती कुटुंबावरील या अचानक कोसळलेल्या दु:खाच्या प्रसंगी महावीर जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेदमुथा यांनी धाव घेऊन कुटुंबास धीर दिला व संजना हिलादेखील परीक्षेसाठी प्रोत्साहीत केले.घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्नीडाग देण्यासाठी मुलगाच पाहिजे, असा साधारणपणे समज असतो. मात्र जळगावातील या दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर या निमित्ताने उमटत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी