शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विनाक्रमांकाची वाळूची वाहने होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:48 IST

विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांनी घेतला आढावादक्षता समितीच्या बैठकीत झाला निर्णयमालमत्तांवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविणार

जळगाव : विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिला. त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.या बैठकीला अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सर्रास सुरू असून ही वाहने पकडल्यानंतरही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पकडलेली वाहने पळवून नेण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून दोन डंपर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच विनाक्रमांकाची वाहने वाळू वाहतुकीसाठी वापरली जातात. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण होते. यापुढे अशी वाहने आढळल्यास ती जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महसूल, आरटीओ व पोलीस विभागातर्फे संयुक्त मोहीम राबविण्याचे ठरले.मालमत्तांवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविणारअवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून ते दंडात्मक कारवाईसाठी जप्त करून जिल्हाधिकारी अथवा तहसील कार्यालयात ठेवल्यास ते पळवून नेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यापुढे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन आढळल्यास त्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून त्यानंतर कोर्टातून संबंधित वाहनचालकास दंडही होईल. तसेच यापूर्वी जप्त केलेल्या वाहनांवरील दंड संबंधित मालकांनी भरणे टाळल्याने ती वाहने अनेक महिन्यांपासून पडून आहेत. अशा वाहनांचा लिलाव करण्याचा तसेच वाहन मालकांचा शोध लागल्यास त्यांच्या मालमत्तेवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव