शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाळू डंपरच्या धडकेत स्वयंपाकी कारागिराचा हात निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:20 IST

महिलाही जखमी

ठळक मुद्देडंपरच्या काचा फोडल्या, चालक फरारदैव बलवत्तर असल्याने दोघे बचावले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ - लग्नाची आॅर्डर असल्याने स्वयंपाकाचे भांडे घेण्यासाठी जात असलेल्या कारागीराच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यात अर्जुन लादूदास वैष्णव (२४ रा, कांचननगर) या दुचाकीस्वार कारागिराच्या हातावरुन चाक गेल्याने हाताचा तुकडा पडला. तर मागे बसलेल्या कविता आनंद कोळी (२५, रा. मोहन टॉकीजजवळ) या जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा दूध संघाजवळ घडला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दैव बलवत्तर असल्याने दोघे बचावलेअर्जुन वैष्णव व कविता कोळी हे स्वयंपाकी कारागिर असून त्यांना लग्नाची आॅर्डर मिळाल्याने ते खोटेनगरकडे स्वयंपाकाचे भांडे घेण्यासाठी दुचाकीवर (एमएच१९ सीबी ०७९९) जात होते. ते दूध फेडरेशनजवळ पोहचले असताना मागून वाळूने भरुन येणाºया भरधाव डंपरने (एमएच १९ वाय ३७५७) दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील कविता कोळी या दूर फेकल्या गेल्या तर अर्जुन वैष्णव हा तरुण दुचाकीवरुन खाली कोसळला. यात तरुणाच्या डाव्या हातावरुन वाळूने भरलेल्या डंपरचे चाक गेल्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला. यात त्याचा अर्धा हात पूर्णपणे निकामी झाला. डाव्या हातासह तरुणाच्या उजव्या हाताला, चेहºयावरही मार लागला आहे. अपघातात महिला दूर फेकली गेल्याने व तरुणाचेही दैव बलत्तर म्हणून ते बालंबाल बचावले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या हाताचा चुराडा झाल्याने त्याचा अर्धा हात काढावा लागला. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्तअपघात होताच संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरवर दगडफेक करीत त्याची तोडफोड केली. वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून अशा जीवघेण्या घटनांमुळे परिसरात भीती पसरली आहे. अपघातानंतर चालक डंपर सोडून पसार झाला. त्यामुळे नागरिक अधिक संतापले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव