शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पुन्हा मानवतेला काळीमा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:40 IST

समता नगरातील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा वाघ नगर परिसरात पाच वर्षीय मुलीला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दस-याच्या दिवशी उघडकीस आली.

ठळक मुद्दे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण नराधम पोलिसांच्या रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगारआधी चोरी करुन केले घाणेरडे कृत्य

सुनील पाटील

जळगाव : समता नगरातील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा वाघ नगर परिसरात पाच वर्षीय मुलीला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दस-याच्या दिवशी उघडकीस आली. चार महिन्यात घडलेल्या या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणा-या आहेत. दोन्ही घटनांमध्ये नराधमांना अटक करण्यात आली असली तरी समाजमनावर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे.दोन्ही घटनांमधून तमाम पालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. शाळा, महाविद्यालयात गेलेली मुलगी असो की अंगणात खेळणारी बालिका ही सुरक्षित आहे? यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. दोन वर्षापूर्वीही रामेश्वर कॉलनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडली होती. २०१४ मध्ये घडलेल्या एका घटनेत तर नात्यातील नराधमाने बालिकेला वासनेची शिकार केली होती. त्याला गेल्या आठवड्यातच मुंबईतून अटक केली. या घटनांवर प्रकाशझोत टाकला तर प्रत्येक मुलीच्या पालकांमध्ये आज भीती निर्माण झाली आहे.  पोट भरण्यासाठी मिळेल तेथे आश्रय घेऊन जीवन जगणा-या वाघ नगरातील या कुटुंबातील हा पाच वर्षीची बालिका आजीजवळ झोपलेली असताना वासनांध झालेल्या नराधमाने तिला उचलून नेत अत्याचार केला. रक्तबंबाळ अवस्थेत रडत असताना जागे झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी धाव घेत मुलीला जवळ घेतले. तिची अवस्था पाहता कुटुंबाची स्थिती तर जीवंतपणीच मेल्यासारखी झाली. समाज मनाचा दबाव व घटनेचे गांभीर्य पाहता थेट पोलीस अधीक्षकापासून यंत्रणा रस्त्यावर उतरली. चार तासाताच अत्याचार करणा-या नराधमाला शोधून काढले. हा नराधम पोलिसांच्या रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार निघाला. आधी चोरी करुन त्याने हे घाणेरडे कृत्य केले.समता नगरातील घटनेतील नराधम आदेशाबाबाचा खटला पुढील महिन्यात न्यायालयात सुरु होत आहे. असे प्रकरण जलदगतीने चालवून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, तेव्हाच या घटनांना पायबंद बसेल.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी