शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:59 IST

जळगाव, भुसावळ, चाळीसगाव रेल्वे स्थानकांचा समावेश ; २०२० पर्यंत प्रमुख स्थानकांचा होणार कायापालट

ठळक मुद्दे-डीआरएम आर.के.यादव

जळगाव : गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवर विविध विकासकामे सुरु असून, रेल्वे मंत्रालयाने आता विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनही उजाळण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी नुकतीच दिल्लीत देशभरातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली. देशभरातील ५०० रेल्वे स्टेशन एलईडी दिव्यांनी उजळण्याचे जाहीर केले असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ , जळगाव, चाळीसगावसह अन्य सहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘लोकमत’ ला दिली.रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा २०२० पर्यंत कायापालट करण्याचे ठरवले असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या भुसावळसह जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्टेशनवर वर्षभरापासून विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आता या स्टेशनचा विविध अंगानी कायापालट करण्याचे ठरवले आहे. त्या करिता रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ८ मार्च रोजी दिल्लीत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी अधिकाºयांकडून त्यांच्या विभागातील स्टेशनच्या विकासासंदर्भात माहिती जाणुन घेतली. या बैठकीला भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव देखील उपस्थित होते.५०० रेल्वे स्टेशनमध्ये भुसावळ, जळगाव, शेगाव, वर्धा,अमरावती, खंडवा आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दर २५ मीटरच्या अंतरावर एलईडी दिव्याचा पोल बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याजवळ लोखंडी प्रवेशद्वार तयार करुन, आकर्षक पद्धतीने या प्रवेशद्वार तसेच दादºयावर आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्येही ठिकठिकाणी हे दिवे लावण्यात येणार आहेत.तसेच इतर स्टेशनवरही याच पद्धतीने दिवे लावून, स्टेशनचा संपूर्ण परिसर उजळवण्यात येईल.रंगीबेरंगी लाईटींगची अधिकच शोभास्टेशनच्या बाहेर आणि आतमध्ये सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील ईमारतीला आकर्षक रंगबेरंगी लाईटींग केली जाईल. ज्यामुळे दुरवरुनच स्टेशन भव्य आणि दिव्य दिसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडणार आहे.रेल्वे मंत्र्यांनी देशभरातील ५०० रेल्वे स्टेशनवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये भुसावळसह इतर सहा स्टेशनचा समावेश आहे. या एलईडी दिव्यांमुळे विजेचीदेखील बचत होणार असून, सुरक्षा आणि अपघाताच्या घटनांनादेखील आळा बसणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनला एलईडी दिव्यांनी उजळणार असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. -आर.के. यादव. डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग