शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: प्रताप तत्वज्ञान केंद्र आहे तेथेच राहणार !

By अमित महाबळ | Updated: March 23, 2024 19:53 IST

Jalgaon News: प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या केंद्राचे कामकाज विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या अंतर्गत चालणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे जी चर्चा समाजमनात चालली आहे, त्यामध्ये तथ्य नाही, असेही कुलगुरूंकडून स्पष्ट करण्यात आले.

- अमित महाबळजळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही ठरावांमुळे अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे विद्यापीठात हलविले जाणार असल्याची चर्चा समाजमनात आहे. त्याविषयी विद्यापीठाने खुलासा करावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी शनिवारी (दि.२३) आयोजित अधिसभेत केली असता, केंद्र स्थलांतराचा कोणताही विचार नसल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या केंद्राचे कामकाज विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या अंतर्गत चालणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे जी चर्चा समाजमनात चालली आहे, त्यामध्ये तथ्य नाही, असेही कुलगुरूंकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, केंद्राच्या कामकाजासंदर्भात सल्लागार समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सभेत क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत समितीची पहिली बैठक झाली आहे, अशी माहिती देण्यात आली. अधिसभेतील नवीन नामनिर्देशित सदस्य प्राचार्य आय. डी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. धीरज वैष्णव यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

सीएचबीबाबत मार्गदर्शन घेणार...तासिका तत्वावरील प्राध्यापकांची (सीएचबी) नियुक्ती केव्हा करणार, महाविद्यालयांनी या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करायची अथवा नाही, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू, असे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले.

व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित राहू शकतील...व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभेचे सदस्य नसतात. त्यांनाही अधिसभेचे कामकाज पाहता यावे, सदस्यांची भूमिका कळावी या हेतूने अधिसभेत निमंत्रित करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना अधिसभेत उपस्थित राहता येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव