शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव पोलीस दलाचे उपक्रम राज्यभर राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:01 IST

महासंचालकांकडून दखल

ठळक मुद्दे‘उत्तम पध्दत ते भावी पध्दत’ पुस्तिकेतही नोंदएम पासपोर्ट अ‍ॅप

जळगाव : जळगाव पोलीस दलाने सुरु केलेल्या आरएफआयडी प्रणाली, एम पासपोर्ट अ‍ॅप व व्हीएमएस प्रणाली याची दखल पोलीस महासंचालकांनी घेतली असून हे उपक्रम राज्यभर राबविले जाणार आहेत. प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक व आयुक्तालयात या उपक्रमांची माहिती पाठविण्यात आली आहे. त्याशिवाय ‘महाराष्टÑ पोलीस उत्तम पध्दत ते भावी पध्दत’ या पुस्तिकेतही या उपक्रमांची नोंद घेण्यात आली आहे.वाढती लोकसंख्या, शहरीकरण, समाजकारण, राजकारण व तंत्रज्ञान यांच्यात प्रचंड बदल झाल्याने गुन्हेगारी देखील तितकीच वाढलेली आहे. वाढती गुन्हेगारी, बदलती गुन्हे पध्दती व गुन्ह्यांचा प्रकार यांना सामोरे जाऊन सक्षमपणे कायदा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी पोलीस दलाच्या कामातही बदल झालेला आहे.राज्यातील ५ विशेष घटक, २ आयुक्तालये, ३ परिक्षेत्रीय कार्यालये व ४ जिल्हे अशा १४ घटकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील समस्यांचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नावीन्यपूर्ण पध्दतीचा वापर केलेला आहे.फिरते पोलीस ठाणे : फिरते पोलीस ठाणे अंतर्गत एका गावाची निवड करुन त्या गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, बीट अमलदार यांना वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करुन पोलीस स्टेशनसंदर्भाची लोकांना माहिती देण्यात येते. हे पथक नागरिकांच्या समस्यांची नोंद घेते व तक्रारीचे निवारण जागेवरच केले जाते. त्यामुळे नागरिकांचा त्रास, वेळ याची बचत होते.काय आहेत जळगावचे उपक्रम?आयरएफआयडी प्रणाली : ही प्रणाली जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आली आहे. गस्तीवर असणारे वाहने किंवा कर्मचारी यांचे निश्चित ठिकाण या प्रणालीमुळे कळते. काही घटना घडल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकते. शिवाय कर्मचाऱ्यांना गस्तीवर जाणे भागच पडते. त्यासाठी ठिकठिकाणी आरएफआयडी यंत्र बसविण्यात आले आहे.व्हीएमएस प्रणाली : या प्रणालीद्वारे अभ्यागतांच्या तक्रारीची अथवा भेटीची विस्तृत नोंद विनापेपर घेऊन त्यास सद्यस्थितीची माहिती कळविली जाते. सायबर क्राईम, वाहतूक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, सुट्टीकालीन सुरक्षा, मालमत्तेच्या गुन्ह्याबाबत घ्यावयाची काळजी, महिलांच्या गुन्ह्यांबाबतची जनजागृती करण्यासाठी मीडिया व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची निर्मितीही करण्यात आली आहे.एम पासपोर्ट अ‍ॅप

या अ‍ॅपद्वारे पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया जलदगतीने होऊन वेळेची बचत होते. आॅनलाईन तक्रारीकरीता सोशल मीडियाचा कक्ष स्थापन करुन व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, प्रतिसाद अ‍ॅप, वाहनचोरी पोर्टल सुरु करुन गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.अपर पोलीस महासंचालक डॉ.प्रज्ञा सरवदे यांचे पत्र व अहवाल प्राप्त झाला आहे. जळगावचे उपक्रम राज्यभर राबविले जाणार असल्याने अभिमानाची बाब आहे. यापुढेही जनतेची कामे सुलभ होण्यासाठी आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील. राज्यातील १४ शहरांच्या उपक्रमाची दखल घेतली व त्यात जळगावचा समावेश आहे.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव