शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

जळगाव पोलीस दलाची बदनामीच थांबेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 10:54 IST

महिलांची छेडखानी असो की बलात्कार या सारख्या प्रकरणांनी २०१८ या वर्षात पोलीस दलाची बदनामी झाली. त्यानंतर आता नवीन २०१९ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पोलीस दलाची बदनामी सुरु झाली, ती लाचखोरीवरुन. दोनशे रुपयाची लाच दिली नाही म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसाने सुरतच्या ट्रक चालकाचे डोके फोडल्याचा प्रकार या आठवड्यात घडला.

ठळक मुद्देविश्लेषणलाच दिली नाही म्हणूनच वाहतूक पोलिसाने दंडूका मारुन फेकला व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सुनील पाटीलजळगाव : महिलांची छेडखानी असो की बलात्कार या सारख्या प्रकरणांनी २०१८ या वर्षात पोलीस दलाची बदनामी झाली. त्यानंतर आता नवीन २०१९ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पोलीस दलाची बदनामी सुरु झाली, ती लाचखोरीवरुन. दोनशे रुपयाची लाच दिली नाही म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसाने सुरतच्या ट्रक चालकाचे डोके फोडल्याचा प्रकार या आठवड्यात घडला. एरव्ही महामार्गावर असो की अन्य कुठे वाहतूक पोलिसांकडून लाच घेण्याचे प्रकरण नवीन नाही. सर्वत्र लाचखोरी बोकाळलीच आहे. ट्रक चालकाचे प्रकरण जरा हटके निघाले, म्हणून त्याची चर्चा अधिक होऊ लागली. या चालकाच्या दाव्यानुसार लाच दिली नाही म्हणूनच वाहतूक पोलिसाने दंडूका मारुन फेकला व त्यात डोळ्याजवळ दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ तयार करायला सुरुवात करताच वाहतूक पोलिसांनी पळ काढला. चालकाने जखमी असवस्थेतील हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तो दोनच दिवसात संपूर्ण देशभरात पोहचल्या. जळगाव पोलिसांच्या लाचखोरीचे किस्से व त्यांना वाहत असलेली शिव्यांची लाखोली यामुळे जळगाव पोलीस दलाचे देशभर अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. हा विषय पोलिसांपुरता मर्यादित नाही. पोलिसांच्या या कृत्याची ठेच जळगाकरांना पोहचली आहे. जळगावचे नाव बदनाम होत असल्याचे जास्त दु:ख आहे.  याआधी सेक्स स्कॅँडलमध्ये जळगावचे नाव देशभर बदनाम झाले होते. जळगावचे वाईट अर्थाने नाव देशभरात पोहचते, तेव्हा आजही या सेक्स स्कॅँडलची आठवण येते. पोलिसांची लाचखोरी ही जळगावपुरताच मर्यादित नाही तर सर्वत्र आहे. मात्र जळगावचेच नाव वारंवार बदनाम होत आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी दहा रुपयासाठी जळगाव पोलिसांची बदनामी झाली होती. परप्रांतीय ट्रक चालकाची इच्छा देवी चौकात एका वाहतूक पोलिसाने अडवणूक केली होती, तेव्हा त्या चालकाकडे फक्त दहा रुपयेच शिल्लक होते, ते देखील पोलिसाने घेतले होते. तेव्हा देखील दहा रुपयासाठी पोलीस दलाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव