शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Jalgaon: दीड कोटी हवेत, केव्हा देता तेवढे सांगा...! 

By अमित महाबळ | Updated: October 18, 2023 17:50 IST

Jalgaon News: समाजकल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेतील सन २०२२-२३ वर्षातील पात्र लाभार्थींना निधीची प्रतीक्षा आहे.

अमित महाबळजळगाव - समाजकल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेतील सन २०२२-२३ वर्षातील पात्र लाभार्थींना निधीची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाकडून १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.

इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या; परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेले अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी जिल्हा मुख्यालय किंवा या मुख्यालयाच्या पाच कि.मी. परिघातील शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला असणे आवश्यक आहे, अशीही एक अट आहे. 

मिळणारे लाभ...स्वाधार योजनेत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर सुविधांसाठी थेट अनुदान देण्यात येते. जळगाव शहरात समाजकल्याण विभागाची तीन वसतिगृहे असून, त्यापैकी दोन मुलांची, तर एक मुलांचे आहे. मुलांची दोन वसतिगृहे मिळून इमारत क्षमता १८० विद्यार्थ्यांची, तर मुलींच्या वसतिगृहाची क्षमता १०० विद्यार्थिनींची आहे.

२०२२-२३ मध्ये ५५४ विद्यार्थी पात्रशैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये ५५४ विद्यार्थी योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी २२१ विद्यार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना देय अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ७१ लाख रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे.

२०२३-२४ सत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहनसन २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सहायक आयुक्त कार्यालय, महाबळ कॉलनी रस्ता, जळगाव या ठिकाणी योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी भाडे कराराची प्रत, शेवटचा वर्ग उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका जोडण्यासह अर्जावर संपर्क क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरूस्वाधार योजनेच्या निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध होताच तो विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे अदा केला जाईल, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयJalgaonजळगाव