शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:31 IST

युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना  त्यांच्या  घराला अचानक आग लागल्याचे समजले.

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक एका घराला आग लागून घरातील कापूस व संसारोपयोगी साहित्य जाळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

    युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना  त्यांच्या  घराला अचानक आग लागल्याचे समजले.  ते झोपेतून उठुनच गल्लीत पळत बाहेर आले व त्यांनी आरोळ्या मारायला सुरुवात केली.  त्यांच्या घरातील लोक गावात दत्त मंदिराची महापूजा सुरू असल्याने ते दिवा लावून मंदिरात गेले होते. कदाचित दिवा पेटून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.गल्लीतील लोक धावत सुटले मिळेल ते साहित्य ,पाण्याच्या नळ्या,बादल्या ,हांडे घेऊन तरुण ,म्हातारे  महिला आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.

घर १०० फूट लांब असल्याने घरात घुसने कठीण होते. तरी काही तरुणांनी एक सिलेंडर कपाटी काढले मात्र कपाटी सुद्ध जळालेल्या होत्या. शेजारील  धनराज दीपा पाटील व प्रल्हाद कौतिक पाटील यांच्याही घराला आग लागली. तेव्हढ्यात जे सी बी मशीन व टिकाव कुदळ्या घेऊन भिंती तोडल्याने संपर्क तुटला. अमळनेर पालिकेचा अग्निशमन बम्ब मागवण्यात आला होता.

टॅग्स :fireआग