शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जळगाव महापालिका निवडणूक : विद्यमान ४५ नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:26 IST

जळगाव मनपा निवडणुकीत एकुण ३०३ उमेदवारांमध्ये ४५ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून सात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिली आहे.

ठळक मुद्दे७ नगरसेवकांनी मुलगा व पत्नीला दिली संधीसात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिलीराष्टÑवादीकडून दोन तर अपक्ष म्हणून दोन नगरसेवक रिंगणात

जळगाव : मनपा निवडणुकीत एकुण ३०३ उमेदवारांमध्ये ४५ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून सात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिली आहे.महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ७५ विद्यमान नगरसेवकांपैकी ४५ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काही नगरसेवकांनी यंदा निवडणुकीतून स्वेच्छेने माघार घेतली तर काही नगरसेवकांचा पक्षांकडून पत्ता कापण्यात आला आहे.राष्टÑवादीकडून दोन तर अपक्ष म्हणून दोन नगरसेवक रिंगणातराष्टÑवादी कॉँग्रेसने अश्विनी देशमुख व दिपाली पाटील या दोन विद्यमान नगरसेविकांना संधी दिली आहे. तर भाजपाने जयश्री नितीन पाटील या विद्यमान नगरसेविकेचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केले आहे. तर लिना पवार यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, एबी फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्या शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.सात नगरसेकांनी कुटुंबीयांना दिली संधीसात विद्यमान नगरसेवकांनी यावेळी माघार घेतली असली तरी कुटुंबातीलच सदस्यांना उमेदवारी दिली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सायराबी अशोक सपकाळे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राजू सपकाळे यांना संधी दिली आहे. संदेश भोईटे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी स्रेहा भोईटे, सुभद्रा नाईक यांच्या ऐवजी मुलगा प्रशांत नाईक, कंचन सनकत यांच्या ऐवजी पती चेतन सनकत, उज्वला बाविस्कर यांच्या ऐवजी पती किशोर बाविस्कर निवडणूक रिंगणात उभे आहेत.भाजपाकडून २० विद्यमान निवडणुकीच्या आखाड्यातभाजपामध्ये निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादी, खाविआ व मनसेच्या काही नगरसेवकांनी प्रवेश घेतला. यामधून काही नगरसेवकांना भाजपाने संधी दिली आहे. भाजपाने या निवडणुकीत २० विद्यमान नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये दत्तात्रय कोळी, भारती सोनवणे, सदाशिव ढेकळे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, प्रतिभा कापसे, सुरेश सोनवणे, शोभा बारी, सुनील माळी, डॉ.आश्विन सोनवणे, सीमा भोळे, दीपमाला काळे, अ‍ॅड.शुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, रविंद्र पाटील, ज्योती चव्हाण, अनिल देशमुख, कांचन सोनवणे, ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे यांचा समावेश आहे.शिवसेनेकडून २१ विद्यमान नगरसेवकांना संधीशिवसेनेने या निवडणुकीत विद्यमान २१ नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये संगिता दांडेकर, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, वर्षा खडके, श्यामकांत सोनवणे, शितल चौधरी, अमर जैन, ज्योती तायडे, ममता कोल्हे, विष्णु भंगाळे, चेतन शिरसाळे, शबानाबी सादीक, सुनील महाजन, जयश्री महाजन, हेमलता नाईक, जिजाबाई भापसे, नितीन बरडे, लता सोनवणे, मुख्तार बी.पठाण, पृथ्वीराज सोनवणे व अनंत जोशी यांचा समावेश आहे.

टॅग्स :WomenमहिलाJalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक