जळगाव : मनपा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीस गुरुवार, १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात झाली असून यामध्ये कोणाचे अर्ज वैध ठरतात व कोण बाद होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले.जळगाव मनपा निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यामध्ये ६१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये शिवसेनेने (खाविआ) ७५, भाजपाने ७५, राष्टÑवादीने ४९, काँग्रेसने १७ वसमाजवादी पार्टीने ६ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये मनसेने एकही अर्ज दाखल केला.५२ नगरसेवकांचे दाखल अर्ज७५ पैकी ५२ विद्यमान नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, २३ नगरसेवकांचा पत्ता कट झाला असल्याचे यादीवर नजर टाकली असता दिसून येते. काही नगरसेवक स्वत:हून उभे राहिलेले नाही.या सर्व दाखल अर्जांच्या छाननीस गुरुवार, १२ जुलै रोजी सकाळी सुरुवात झाली. यात काय होणार, याबाबत सर्वांना उत्कंठा लागली आहे. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.१७ जुलैपर्यंत माघारीची मुदत असून १८ रोजी चिन्ह वितरीत करण्यात येतील. १ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होऊन ३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होऊन ती पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
जळगाव मनपा निवडणूक : छाननीत काय होणार ? उत्कंठा शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:35 IST
६१५ उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव मनपा निवडणूक : छाननीत काय होणार ? उत्कंठा शिगेला
ठळक मुद्दे५२ विद्यमान नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेयादी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध