शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जळगाव मनपा निवडणूक : मतदान केंद्रांकडे जाणारी वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:10 IST

मतदानाला जायचे कसे? - नागरिकांचा सवाल

ठळक मुद्देकुठे खड्डे, चिखल तर कुठे वाढले गवतखंडेराव नगरातील रस्त्याची दैना

जळगाव : पिंप्राळा हुडको, खंडेरावनगर, कांचननगर, वाल्मीकनगर, दिनकरनगर, प्रजापतनगर, पिंप्राळा गावठाण, शंकररावनगर, जुनाखेडी रोड या भागातील मतदान केंद्राकडे पायी चालण्यासाठीही रस्ता उरलेला नाही. रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली असून, दगड-गोटे वर आल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.१ आॅगस्ट रोजी मनपा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदारांना सोयीचे व्हावे. यासाठी ठरावीक अंतरावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर वयोवृद्ध, अपंगा बांधवांच्या सोयीसाठी रॅम्पदेखील उभारण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, मतदान केंद्राकडे जाण्याची वाट बिकट असल्याने, केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.खंडेराव नगरातील रस्त्याची दैनाखंडेरावनगर, मयुरनगर,पिंप्राळा गावठाण या भागातील मतदारासांठी खंडेरावनगरातीलच लक्ष्मीबाई खंडू मंगळे या प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही शाळा असल्याने, या ठिकाणी रॅम्पची आवश्यकता नाही. मात्र, या केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचीच अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी तर रस्त्यामधील दगड-गोटे बाहेर येऊन इतरत्र पसरले आहेत. वाहनधारक या मोठ्या आकाराच्या दगड-गोट्यांना चुकवित मार्ग काढावा लागतो. मात्र, नजरचुकीने त्यावरुन वाहनाचे चाक गेल्यास वाहन घसरण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील काही खड्ड्यांचा आकार अत्यंत मोठा असून, खड्डयांचा अंदाज येत नसल्याने, दोन दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराची दुचाकी घसरुन अपघात झाल्याची घटना घडली.हुडकोतील मनपा शाळाया केंद्राच्या काही अंतरावर हुडकोतील नागरिकांसाठी तेथील मनपाच्या शाळेत मतदान केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणच्या रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. साईड पट्टयांची तर अत्यंत दुरवस्था झाली असून, या ठिकाणाहून वाहन गेल्यास, घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणीदेखील काही ठिकाणी पाणी तुंबत असल्याने, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान,या संदर्भात काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करुनही रस्त्याची साधी डागडुजीही झाली नसल्याचे हुडकोतील अजय शिंदे यांनी सांगितले.नवीन प्राथमिक विद्यालयश्रीराम कॉलनी, दत्तनगर, के.सी.नगर,शंकररावनगर या भागातील मतदारांसाठी नवीन प्राथमिक विद्यालयात मतदानाची सोय करण्यात आली आहे. या केंद्राकडे येण्यासाठी मुख्य रस्ता वगळता, इतर रस्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दत्तनगरातील गल्ली-बोळीतील रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन वस्ती तयार झाली आहे. परंतू, या नवीन वस्त्यांमध्ये पक्के रस्ते नसल्याने, दरवर्षी या ठिकाणी चार महिने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. श्रीराम कॉलनीकडून असोदा रस्त्याकडे येणार रस्त्यावर, काळ््या मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने, नागरिकांना तो रस्ताच बंद करावा लागला.प्रजापतनगरात प्रचंड चिखलप्रभाग क्रमांक २ मधील मतदारासांठी प्रजापतनगरातील कुंभारवाडा समाज मंदिरामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राकडे जाण्यासाठीही रस्त्यांची दैना झाली आहे. कुठल्याही ठिकाणी पक्के रस्ते नसल्याने, काळ््या मातीमुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. यामुळे वाहन घसरुन, अपघात होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते.कांचन नगरातील मतदान केंद्रकांचननगर, वाल्मीकनगर व दिनकरनगरातील मतदारासांठी येथील महर्षि वाल्मीक मंदिरासमोरील महापालिकेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. असोदा रस्त्यालगतच ही शाळा असल्याने, रस्त्यालगतच्या रहिवाशांनी मतदानाला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता आहे. मात्र, वाल्मीक नगर, दिनकर नगरातील आतमध्ये घरे असणाºया मतदारांना मात्र मतदान केंद्रावर येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. वाल्मीकनगरकडे जाणाºया रस्त्यावरच मोठे खड्डे पडल्याने, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून चिखल झाला आहे. पाऊस सुरु असताना तर, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने वापरण्यासाठी वाट राहत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. जर मतदानाच्या दिवशी पाऊस सुरु असला आणि नेहमीप्रमाणे या रस्त्यावर पाणी तुंबल्यावर, आम्ही मतदानाला कसे जाणार, असा प्रश्नही येथील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे. प्रशासनाने खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.मतदान केंद्रासमोरच साचला तलाव४कांचननगरासह वाल्मीकनगर व दिनकरनगरातील मतदारासांठी येथील वाल्मीक मंंदिरासमोरील मनपाच्या शाळेत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मतदान केंद्राकडे येणाºया सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या प्रवेशद्वारावरच काळ््या मातीमुळे चिखल झाला असून, केंद्रात जाण्यासाठीही व्यवस्थित वाट नाही. तर केंद्राच्या समोरील मोकळ््या मैदानावरच मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असून, पाऊस सुरु असताना मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. तसेच या ठिकाणी काडी-कचरा साचून दुर्गंधीदेखील निर्माण झाली आहे. जर मतदान केंद्रावर गर्दी झाली तर, मतदारांना उभे राहण्यासाठीही जागा राहणार नसल्याचे दिसून आले.तर प्रत्येकाकडून मिळते आहे रस्त्यांचे आश्वासनशहरातील काही मतदान केंद्रांची प्रातिनिधीक स्वरुपात ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, काही ठिकाणी मतदारांना चालण्यासाठी पायवाटदेखील नसल्याचे दिसून आले. पावसामध्ये प्रचारासाठी येणाºया उमेदवारांकडे येथील नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रार करित आहेत. यावर उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर पहिल्यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव