शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिका निवडणूक : काळे परिवाराची तिसरी पिढी राजकारणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 11:42 IST

राजकारणातील कुटुंब

ठळक मुद्देतीन सदस्यांकडून निवडणूक रिंगणात उडीराजकारणात नशिब आहे आजमावत

जळगाव : शेती हा पारंपरिक व्यवसाय असलेल्या जुने जळगाव भागातील मूळचे रहिवासी व माजी नगराध्यक्ष पांडूरंग उर्फ बंडू काळे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात नशिब आजमावत आहे. या निवडणुकीत काळे कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत.जुने जळगावातील रहिवासी असलेले रघुनाथ सोमा काळे यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय. १९४० मध्ये त्यांनी युवक काँग्रेसचे काम सुरु केले. त्यानंतर जळगाव फ्रुटसेल सोसायटीचे सलग १५ वर्ष चेअरमन राहिले. १९६७ मध्ये त्यांनी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्यानंतर काळे कुटुंबातील सदस्य व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांनी रमेश पंडीत चौधरी यांच्या विरोधात १९७४ मध्ये पहिली निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या ६३ मतांनी पराभव झाला. त्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरु केला. १९८५ ते १९९५ या दरम्यान ते स्वीकृत नगरसेवक म्हणून होते. त्यानंतर १९९५ ते २००८ या कालावधीत बंडू काळे व त्यांच्या पत्नी सुधा काळे या विजयी झाल्या. २००८ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत काळे दाम्पत्य पराभूत झाले. त्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली. त्यांचे पुतणे मनोज काळे हे २००३ ते २००८ या दरम्यान नगरसेवक म्हणून राहिले.२०१३ मध्ये त्यांच्या सुन दिपमाला काळे व मुलगी डॉ.पुनम काळे-येवले यांनी निवडणूक लढविली. सुन दिपमाला काळे या विजयी झाल्या तर डॉ.पुनम काळे या अवघ्या ६३ मतांनी पराभूत झाल्या. या निवडणुकीत काळे परिवारातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यात प्रभाग ७ ब मधून दिपमाला काळे निवडणूक लढवित आहेत.बंडू काळे यांचे चिरंजीव अमित काळे हे प्रभाग ६ मधून तर त्यांचे दुसरे चिरंजीव पंकज काळे हे प्रभाग ६ ड मधून निवडणूक लढवित आहेत.अमित हे यांनी व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली आहे. त्यासोबतच बीबीएम देखील केले आहे. पंकज काळे यांनी व्यवस्थापन शास्त्र व त्यासोबत एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील ते करीत आहेत.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव