शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

जळगाव मनपा निवडणूक : २८ वर्षांपासून सोनवणे कुटुंबाचे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:45 IST

पणजोबांपासून राजकारणाचा वारसा

ठळक मुद्देकैलास सोनवणे १९९१ पासून नगरसेवकभारती सोनवणे यांना उपमहापौरपदाचा मान

जळगाव : नगरपालिका व त्यानंतर महापालिकेवर सलग २८ वर्षांपासून कैलास सोनवणे व त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधीत्व आहे. एवढेच नव्हे तर जळगावतालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद १९ वर्र्षेया कुटुंबाकडे होते.कैलास सोनवणे यांच्या मातोश्रींचे आजोबा अर्जून फुलजी सोनवणे (अर्जून पैलवान) हे मूळचे रिधूरचे रहिवासी होते. त्यांनी जळगाव नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ते पराभूत झाले. त्यांची मुलगी जयवंताबाई सोनवणे यादेखील नगरपालिका निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.कैलास सोनवणे यांनी महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यावेळी निवडणुकांवरून हाणामाऱ्या झाल्याने ती निवडणूकच रद्द झाली. नूतन मराठामहाविद्यालयातत एम.ए.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असतानाच १९९१ साली त्यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्या निवडणुकीत ते विजयी झाले.तेव्हापासून आजपर्यंत सलग सहा वेळा निवडून आले आहेत. गेल्या २८ वर्षांपासून सलग नपा व आता मनपावर प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील निवडणुकीत शहर विकास आघाडी स्थापन करून त्यांनी निवडणूक लढविली. त्यांनी विरोधी पक्षनेता, गटनेता, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती, स्थायी समिती सभापती, आस्थापना सभापती आदी विविध पदेही भूषविली आहेत. शेळगाव वि.का. सोसायटीवरही ते सदस्य आहेत.भारती सोनवणे २००१ मध्ये पहिल्यांदा नगरपालिका निवडणूक जिंकल्या. त्यांचीही नगरसेवकपदाची सध्याची तिसरी टर्म आहे. कैलास सोनवणे यांच्या भाची सरिता सपकाळे यादेखील विद्यमान नगरसेविका आहेत. तर मावशी लीलाबाई सपकाळे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. यावेळी ते स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत होते.सोनवणे कुटुंबाचे जळगाव तालुक्यातील शेळगाव हे मूळ गाव. नारायण सोनवणे हे गावाच्या राजकारणात सक्रीय होते. १९९५ मध्ये त्यांची सरपंचपदी निवड झाली. तेव्हापासून सरपंचपद सोनवणे कुटुंबाकडेच आहे.नारायण सोनवणे यांनी सुरेशदादांच्या विरोधात जिल्हा बँकेची निवडणूकही लढविली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ते केवळ ३ मतांनी पराभूत झाले. त्यांचे पुत्र प्रल्हाद सोनवणे व अलका प्रल्हाद सोनवणे यांनी सरपंचपद भुषविले आहे. तर त्यांचा मुलगा जयदीप हादेखील शेळगाव वि.का.सोसायटीवर संचालक होता.भारती सोनवणे यांना उपमहापौरपदाचा मानकैलास सोनवणे यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून त्यांनी खान्देश विकास आघाडीसोबत मनपात सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे उपमहापौरपद त्यांच्या आघाडीकडे आले. कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी उपमहापौरपद भूषविले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव