शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव मनपा निवडणूक : विकासाच्या नावावर भ्रष्टाचार - दिलीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:14 IST

शासनाचा निधी सत्ताधाऱ्यांच्या घरात

ठळक मुद्देघरकुल, व्यापारी संकुल योजनेत गैरव्यवहारपावसाला सुरुवात आणि पटांगण खाली

जळगाव : शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून विकास करणे अपेक्षित असताना महापालिकेतील सत्ताधाºयांनी विकासाच्या नावावर भष्ट्राचार केला. शासनाकडून आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपली घरे भरल्याचा आरोप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांनी महाबळमधील जाहीर सभेत केला.गुरुवारी रात्री प्रभाग १२ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, सुरतच्या आमदार संगीता पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार उन्मेष पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्यासह भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.घरकुल, व्यापारी संकुल योजनेत गैरव्यवहारसत्ताधाºयांनी जळगाव शहराचा विकास आराखडा तयार करून विकास करणे गरजेचे होते. मात्र घरकुल योजना व व्यापारी संकुलाच्या कामातून केवळ भष्ट्राचार झाला. आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपले घरे भरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार उन्मेष पाटील यांनी व्यक्ती पाहून मतदान करण्यापेक्षा पक्ष पाहून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार संगीता पाटील यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन केले. सुरत महानगरपालिकेचे ५ हजार ६०० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्या तुलनेत जळगावातील रस्त्यांची मात्र दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार ए.टी.पाटील यांनीही मार्गदर्शन केले.पावसाला सुरुवात आणि पटांगण खालीसुरतच्या आमदार संगीता पाटील यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळेत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन खुर्च्या रिकामा झाल्या.दिलीप कांबळे यांची गणेश कॉलनी चौकातही सभा झाली.सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणाने निधी खर्च झाला नाहीआमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेची जबाबदारी नेमकी काय? असा प्रश्न उपस्थित केला. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारच्या नावाने ओरडत असताना अमृत योजना, भुयारी गटार योजना व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी कुणी दिला असे सांगितले. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी दिला. मात्र सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा निधी खर्च झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव हे मोठ खेड...कांबळे म्हणाले की, आमदारांनी शहरासाठी शासनाकडून निधी आणला तरीही तो निधी खर्च करण्यासाठी मनपाकडे जातो. त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही, की निधी आणूनही विकास होत नाही. मनपाने शहर विकास आराखडा करून शासनाकडून निधी आणून विकास करायला हवा होता. मात्र जळगाव हे आज मोठ खेड असल्याचे जाणवते, अशी टीका त्यांनी केली.मनपाने दलित वस्तीचा निधी वळविल्याची होणार चौकशीशासनाने दलित वस्तीच्या विकासासाठी दिलेला निधी मनपाने अन्यत्र खर्च केला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. सकाळी समतानगर परिसरात रॅलीला गेलो असताना त्या भागात रस्त्यांचा अभाव असल्याचे व चिखल असल्याचे, गटारी उघड्या असल्याचे दिसून आले. याबाबत महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे व नागरिकांकडून माहिती घेतली असता दलित वस्ती सुधारणेसाठी राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी रस्त्यासाठी न वापरता अन्यत्र वळविण्यात आला. वास्तविक दलित वस्तीचा निधी त्याच वस्तीच्या विकासासाठी वापरणे बंधनकारक आहे. एवढे वर्ष शासनाकडून हा निधी मिळत असतानाही या वस्त्यांमध्ये अशी बिकट परिस्थिती दिसून आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव