जळगाव : महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी दाखल झालेल्या ६१५ उमेदवारी अर्जांची छाननी तब्बल दोन दिवसानंतर शुक्रवारी पूर्ण झाली. यामध्ये १८८ उमेदवारी अर्ज बाद ठरले असून, छाननीअंती ४२७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. १७ रोजी माघारीची शेवटची मुदत असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून छाननीचे काम सुरु होते. शुक्रवारी ते संपले व वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.वैध ठरलेल्या अर्जांमध्ये तब्बल २०० अपक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. भाजपा व शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र, अनेकांचे तिकीट कापले गेल्यामुळे अनेक नाराज उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची संख्या असल्याने अनेक दिग्गज उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. माघारीसाठी १७ जुलै पर्यंतची मुदत असल्याने अनेकांकडून अपक्षांचे मत वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.एमआयएम देखील रिंगणातआॅल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून देखील सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.१७ नंतरच चित्र स्पष्टछाननी संपल्यामुळे आता माघारीसाठी तीन दिवस शिल्लक आहेत. पक्षांकडून काही अधिकृत उमेदवारांची माघार घेवून काही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याबाबतच्या हालचाली राजकीय पक्षांकडून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे किती उमेदवार माघार घेतात व किती उमेदवार अंतीम आखाड्यात राहतात हे १७ जुलैनंतरच स्पष्ट होणार आहे.
जळगाव महापालिका निवडणूक : १८८ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 11:32 IST
उरले ४२७ अर्ज
जळगाव महापालिका निवडणूक : १८८ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद
ठळक मुद्देअपक्षांची मनधरणी सुरु१७ नंतरच चित्र स्पष्ट