शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिकेस ३० कोटी विशेष अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:29 IST

गिरीश महाजन यांची माहिती

ठळक मुद्देसमांतर रस्त्यांचे काम महिनाअखेरबलून बंधाऱ्यांना मान्यता

जळगाव : राज्य शासनाकडून शहराच्या विकासासाठी मंजूर केलेला १०० कोटींचा निधी हा राज्याच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर आहे. यात मनपाकडून ३० कोटी उभारणे अपेक्षित आहे. मात्र मनपाची यासाठी तयारी नसल्याने हा निधी विशेष अनुदान म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी मनपाने पत्र द्यावे अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रपरिषदेत सांगितले.शहराचा चेहेरामोहरा बदलवूशहराचा चेहेरामोहरा बदलवू असा शब्द मी जळगावकरांना दिला आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात शहरात कामे दिसतील. यात कोणताही बदल नसेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.वरखेडे लोंढे, शेळगाव बॅरेजमध्ये जुलैत पाणी थांबणारजिल्ह्यात महत्वाकांक्षी असलेल्या वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेजमध्ये पुढील वर्षी जुलै महिन्यात पाणी थांबणार आहे.बलून बंधाºयांना राज्यपालांची मान्यतामेगा रिचार्ज प्रकल्पाचे नुकतेच हवाई सर्वेक्षण झाले. गिरणा नदीवरील सात ठिकाणी बलून बंधारे बांधरे प्रस्तावित आहे. त्यांना राज्यपालांची मान्यता बाकी होती तीदेखील मिळाली. सुमारे ७०० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. निम्न तापी प्रकल्प केंद्राच्या पंतप्रधान कृषि सिचाई योजनेतून करणे प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी एकरकमी पैसा मिळावा असे प्रयत्न आहेत.बोदवड उपसा योजनेचे १०० कोटींचे काम आतापर्यंत झाले आहे. भागपूर योजनेचे कामही अंतिम टप्प्यात असून दीड हजार कोटींचा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाच्या लोकार्पणास मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा लवकरच येतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.भुयारी गटारींचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लागणारमहामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन महामार्गास समांतर असे रस्ते प्रस्तावित आहेत. यासाठीच्या आराखड्यास मंजूरी मिळाली असून महिनाअखेर या कामांना सुरूवात होईल असे गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगावात पाणी बचत करावी लागणार. वेळ पडल्यास पाणी पुरवठ्यात तीन दिवसाआड होण्याची शक्यता आहे. भुयारी गटारींच्या कामांचा प्रश्न आठवडाभरात सुटेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम पूर्ण करणार, असेही गिरीश महाजन म्हणाले.

टॅग्स :fundsनिधीJalgaonजळगाव