जळगाव महानगरपालिकेत एकाच दिवशी 49 कर्मचारी बडतर्फ, आयुक्तांचा नगरसेवकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:57 AM2017-11-15T11:57:38+5:302017-11-15T12:06:18+5:30

कर्मचा-यांमध्ये खळबळ

In Jalgaon Municipal Corporation, 49 employees of the corporation, commissioners of corporation, | जळगाव महानगरपालिकेत एकाच दिवशी 49 कर्मचारी बडतर्फ, आयुक्तांचा नगरसेवकांना दणका

जळगाव महानगरपालिकेत एकाच दिवशी 49 कर्मचारी बडतर्फ, आयुक्तांचा नगरसेवकांना दणका

googlenewsNext
ठळक मुद्देदोन टप्प्यात कारवाईदुपारी निघाले आदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - कामावर सतत गैरहजर रहाणे, राजकीय व्यक्तींकडे तक्रारीची धमकी देणे यासह विविध कारणांमुळे  मनपाच्या प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी एकाच दिवशी 49 कर्मचा:यांना बडतर्फ केले. यात मनसेच्या नगरसेविका लिना पवार यांचे पती राम उर्फ नवीन पवार, भाजपाच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांची पती मोहन, तर रवींद्र पाटील यांचे बंधू योगेश यांचा समावेश आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने कर्मचा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
काम न करता केवळ स्वाक्षरी करून निघून जाणे, कामावरच न येणे  अशा 45 कर्मचा:यांची यादी प्रत्येक विभाग प्रमुखांकडून गोपनीय अहवाल मागवून महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती.   विभाग प्रमुखांच्या   अहवालाची   गंभीर दखल घेऊन दोन कनिष्ठ अभियंत्यांसह 45 जणांना बडतर्फीची अंतिम नोटीस तसेच 17 निलंबित कर्मचा:यांच्या बडतर्फीची अंतिम नोटीस   मनपा प्रशासनाने 27 ऑक्टोबर रोजी बजावली होती.   नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसात या कर्मचा:यांना नोटीसला उत्तर द्यावयाचे होते. बहुतांश कर्मचा:यांनी उत्तरही दिली होती.  तर काहींनी समाधानकारक उत्तरे  न दिल्याने कारवाई करण्यात आली. 
मंगळवारी दुपारी 49 जणांच्या बडतर्फीचे आदेश प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. यानंतर तातडीने संबंधीतांना बडतर्फीच्या आदेशांची प्रत बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 
आणखी काही जण रडारवर
महापालिकेत आणखी बरेच दांडीबहाद्दर कर्मचारी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यांची गोपनिय माहिती विभागप्रमुखांकडून मागविण्यात आली होती. काहींबाबत अहवाल प्राप्त झाल्याने त्याची छाननी करून प्रथम बडतर्फीची नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केली जाईल. जवळपास 50 ते 75 कर्मचा:यांवर ही कारवाई होण्याची शक्यता आहे.  
दरम्यान, बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर 17 मजलीत सायंकाळी जोरदार चर्चा सुरु होती.  
हे आहेत बडतर्फ केलेले कर्मचारी
बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचा:यांमध्ये शिपाई, रचना सहाय्यक, मजूरांचा समावेश आहे. यात शिवाजी पवार, कैलास बळीराम कोळी, अरविंद पंडित भोळे, कांतिलाल रामदास सोनवणे, संजय सोपान काळे, अनिता जितेंद्र सपकाळे, शंकर सिताराम सोनवणे, भास्कर वासुदेव कोळी, सतीश मोतिराम पाटील, निता रामलाल अटवाल, सुरेखा उत्तम पाटील, प्रतिभा संतोष पाटील, मोतिलाल सिताराम सपकाळे, साहेबराव अजरून सपकाळे, परशुराम पांडुरंग सोनवणे, एकनाथ वामन चौधरी, रमेश आनंदा सोनवणे, रामचंद्र लोटू सपकाळे, सुभाष देवराम बाविस्कर, मंगला रामभाऊ ठाकुर, हिराबाई पुरूषोत्तम कोळी, नवीन रवींद्रनाथ पवार, घनश्याम भास्कर कोल्हे, विनायक नारायण नन्नवरे, राजू किसन सपकाळे, उषाबाई अरूण सपकाळे, कल्पना रवींद्र मिस्तरी, विक्रम जनार्दन पाटील, ज्ञानेश्वर विश्वनाथ सोनवणे, संजय विश्वनाथ सोनवणे, शेखर गणेश सोनवणे, सुनील भानुदास अत्तरदे, दिलीप मुरलीधर नारखेडे, गंगाधर श्रावण गायकवाड, मोहन वासुदेव बेंडाळे, नितीन रवींद्रनाथ पवार, चंद्रशेखर ओंकार जोशी, अनिल आत्मचरण ढंडोरे, सुरेश बळीराम सोनवणे, इकबाल खॉ उस्मानखॉ, रफीख शेख मेहमुद, योगेश चंद्रकांत पाटील, आरीफ पठाण, जितेंद्र सुकदेवराव यादव, दिनेश धरमदास नन्नवरे, जगतसिंग प्रतापराव पाटील, मनोज देवचंद सोनार, मोहन रामकृष्ण पालवे, संजय साहेबराव सोनवणे या 49 कर्मचा:यांचा समावेश असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. 
अशी आहेत बडतर्फीची कारणे.. विभाग प्रमुखांशी अरेरावी करणे तसेच कामावर सतत गैरहजर रहाणे, राजकीय व्यक्तींकडे तक्रारीची धमकी देणे, चुकीची माहिती देऊन महापालिकेची प्रतिमा मलिन करणे, परस्पर स्वाक्षरी करून दादागिरी करत निघून जाणे, कार्यालयीन वेळेत महापौरांशी अरेरावी करणे, दंगलीत सहभागी असल्याने अटकेत असणे, बनावट जन्म दाखले तयार करून देणे, फौजदारी गुन्हा दाखल असल्याने, जिल्हाधिका:यांच्या अंगावर शाई फेकली, मुलीला घेऊन पळून गेल्याने कोर्टात केस सुरू आहे, दंगलीत सहभाग असल्याने न्यायालयीन खटला सुरू आहे, फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली असल्याने अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. 
गेल्या महिन्यात पहिल्यांदा 20 जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही जणांच्या बडतर्फीच्या प्रस्तावांची अतिशय बारकाईने छाननी सुरू होती. या महिन्याच्या प्रारंभी रात्री 10 वाजेर्पयत प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर,  अपर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अस्थापना अधीक्षक सुभाष मराठे हे मनपात बसून प्रस्तावांची बारकाईन तपासणी करून नंतर  बडतर्फीच्या आदेशांसाठी ही नावे निश्चित करण्यात येत होती.

Web Title: In Jalgaon Municipal Corporation, 49 employees of the corporation, commissioners of corporation,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.