शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तळघरातील मेडिकल स्टोअर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 19:43 IST

जळगाव शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली़

ठळक मुद्देअंकुर हॉस्पिटलमधील मध्यरात्रीची घटना४० हजारांची रोकड लंपासहॉस्पिटलच्या द्वारास बांधली होती दोरी

जळगाव : शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ हा चोरटा हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून चोरी करण्याआधी त्याने हॉस्पिटलचे दार दोराच्या साहाय्याने बंद केल्याचे त्यात दिसून आले आहे़संदीप निवृत्ती पाटील हे गिरणा टाकी परिसरात वास्तव्यास असून त्यांचे मणियार ग्राऊंडमागे असलेल्या अंकुर हॉस्पिटलमध्ये साईप्रसाद नावाचे मेडिकल आहे. या मेडिकलवर जितेंद्र नामदेव मोतीराळे (रा. मामलदे, ता. चोपडा) हा कामाला असून तो दररोज सकाळी ९ वाजता मेडिकल सुरू करून रात्री ९ वाजता मेडिकल बंद करतो. शनिवारी रात्री जितेंद्र हा नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता मेडिकलला कुलूप लावून घरी निघून गेला. रविवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास जितेंद्र हा मेडिकल उघडण्यासाठी आला असता त्याला मेडिकलच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. यावेळी जितेंद्रने याबाबतची माहिती तत्काळ संदीप पाटील यांना फोनवरून दिली. संदीप पाटील हे काही वेळातच आपल्या मेडिकलवर दाखल झाले. त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन बघितले असता. त्यांना मेडिलकलच्या गल्ल्यातील ४० हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव