शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

जळगावच्या बाजारपेठेत धान्य, डाळींमध्ये तेजी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:46 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी स्थिर असलेल्या डाळींमध्ये गेल्या आठवड्यापासून भाववाढ होत असून या आठवड्यात गव्हामध्येही वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी कायम असल्याने त्यांचेही भाव वाढले आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध आल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८१०० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीत गेल्या आठवड्यात २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५७०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ७८०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवरुन ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हातही तेजीअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे गव्हाला मागणी वाढल्याने गेल्या महिन्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. मात्र गव्हाची आवक चांगली असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून गव्हाचे भाव स्थिर होते. मात्र आता त्यातही वाढ झाली आहे. २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२०० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३७०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.तांदुळाचेही भाव वाढलेतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही वाढ झाली आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव