शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह धान्याच्या भावात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:45 IST

बाजारगप्पा : जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे.

- विजयकुमार सैतवाल, जळगाव

जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात डाळींच्या भावात वाढ झाली आहे. तांदूळ स्थिर असल्याने तेवढा दिलासा असल्याचे मानले जात आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यांपासून वाढत आहेत.  यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाऱ्या काळातच उडीद, मूग, तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ सुरू आहे. 

यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी  येत आहे. या आठवड्यात तर गव्हाचेही भाव वाढले असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली. गेल्या आठवड्यात ७४०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.

उडदाच्या डाळीतही वाढ होऊन ती ६४०० ते ६८०० रुपयांवरून ६५०० ते ६९००  रुपये प्रतिक्विंटल झाली. गेल्या आठवड्यात ६२००  रुपये प्रतिक्विंटलवर असलेल्या  हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत, तर तूरडाळदेखील ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटलवरून ६६०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल झाले आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत, तसेच चांगल्या दर्जाच्या उडदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.

अनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यानंतर आता पुन्हा दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने या आठवड्यात १०० रुपये प्रतिक्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. १४७ गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २६५० ते २७५०  रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचा भाव २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल, चंदोसीचा भाव ३८५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी