शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लोकसंघर्ष मोर्चाचा ‘लढेगे...जितेंगे’ चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : हक्कासाठी निघालेल्या एल्गार मोर्चाने वेधले लक्ष

ठळक मुद्देआदिवासींना वन हक्क कायद्याचा लाभ मिळावावैयक्तीक वन हक्काबाबत अशंत: मंजूर दावेदारांचे पुर्नपडताळणी प्रक्रिया करण्यात यावी. यासाठी प्रक्रिया कशी व कोणत्या तारखेपासून असावी याबाबत लेखी द्यावे.न्यायप्रविष्ट सामूहिक दावे अंशत: मंजूर केले आहेत. अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यात यावी.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.८- लोक संघर्ष मोर्चातर्फे गुरुवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या मोर्चात दोन हजारावर आदिवासी, दलित व मुस्लीम बांधव सहभागी झाले. लोकसंघर्ष मोर्चात ‘लढेगे...जितेंगे’चा नारा देण्यात आला.या मोर्चाला दुपारी १ वाजता डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्त्व प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, सचिन धांडे, धर्मा बारेला, फिरोज तडवी, झिलाबाई वसावे, लता झाल्टे, भरत बारेला, मुकुंद सपकाळे यांनी केले. मोर्चा नेहरू पुतळा, कोर्ट चौक, स्टेट बँक चौक, नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला.निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी रस्त्यावर यावे...मोर्चेकºयांनी निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी यावे अशी मागणी केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मोर्चेकºयांनी घेतली. पोलिसांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ न्यावे असे आवाहन केले. मात्र मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते.मोर्चात बुधा बारेला, कुर्बान तडवी, मुस्तफा तडवी,केशव वाघ, अतुल गायकवाड, चंद्रकांत चौधरी,रमेश बारेला, पंडू बारेला, ताराचंद पावरा, संजय बारेला, प्रेमसिंग बारेला यांच्यासह आदिवासी सहभागी झाले.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार