शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक कविवर्य ना.धो. महानोर अनंतात विलीन

By चुडामण.बोरसे | Updated: August 4, 2023 18:37 IST

Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

जळगाव - शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पळसखेड या मुळ गावी सायंकाळी ‘सुलोचना बाग’ या महानोरांच्या शेतात त्यांचे धाकटे चिरंजीव डॉ. बाळकृष्ण महानोर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.  

अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवऱ्या आणि चंदनाच्या फुलांचे हार यांचा उपयोग करण्यात आला. तीन वेळा हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर महानोर परिवाराच्या सदस्यांनी अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. सायंकाळी ५.१० वाजता कवी महानोर यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, साहित्यिक रंगनाथ पठारे, सुमती लांडे, श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, कवी दासू वैद्य, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, पुर्णिमा हुंडीवाले, अब्दुल नवाज राही, रंगकर्मी शंभु पाटील आदी उपस्थित होते.  

महानोर हे महाकवी आणि रानकवी होते. त्यांच्या शब्दांचाच रंग हिरवा होता. मोठ्या मनाच्या या माणसाने  पुन्हा परतून यावे, अशी भावना अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केल्या.  श्रीकांत देशमुख यांनी म्हटले की, महानोर हे अजिंठा लेण्यांप्रमाणे एक लेणं होते. गाण्याचा चेहरा बदलणारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलेच कवी होते.  रंगनाथ पठारे म्हणाले की, ‘महानोरांनी साहित्याला श्रीमंत केले. आणि त्यांचे देणं कधीही संपणार नाही.’  अंत्यसंस्कार सुरु असतांना ‘पीक करपलं, पक्षी दुर देशी गेला’ हे गीत वाजवण्यात येत होते.

टॅग्स :Jalgaonजळगावmarathiमराठी