शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अवैध धंदे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनाच ‘कोर्स’ची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:10 IST

जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत दिला.

ठळक मुद्देजळगाव पोलीस अधीक्षकांचा इशारासाडेआठ तास चालली गुन्हे आढावा बैठकपोलीस अधीक्षकांनी फोडला अधिकाºयांना घाम

जळगाव : जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत दिला.पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली ही बैठक सायंकाळी सहा वाजता संपली. प्रथमच साडेआठ तास मॅरेथॉन बैठक चालली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी अधिकाºयांना चांगलाच घाम फोडला.बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस स्टेशननिहाय गुन्ह्यांचा आढावा घेतला. प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढण्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ८० कर्मचाºयांना नवचैतन्य कोर्ससाठी मुख्यालयात जमा केले असले तरी अजूनही काही प्रमाणात धंदे सुरु असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे प्रभारी अधिकाºयांनी त्याची खबरदारी घ्यावी, अन्यथा प्रभारी अधिकाºयांनाही नवचैतन्य कोर्ससाठी आणून दुय्यम अधिकाºयांना त्यांच्या जागी संधी दिली जाईल.

कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे हीच अपेक्षा आहे. आता प्रभारी अधिकाºयांनाच नियंत्रण कक्षात आणण्यासह नवचैतन्य कोर्सही सक्तीचा केला जाईल. गुन्हे आढावा बैठकीतही अधिकाºयांना तंबी दिली आहे. -दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस