शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा सोने बाजार वर्षभरात सहा वेळा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 03:07 IST

१५ महिन्यांत १०१ दिवस व्यवहार ठप्प

जळगाव : दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सोने-चांदी बाजार लॉकडाऊन, निर्बंध, जनता कर्फ्यू, ब्रेक द चेन अशा वेगवेगळ्या नावाखाली वर्षभरात सहा वेळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ऐन खरेदीच्या हंगामात व्यवसाय ठप्प होत असल्याने करोडो रुपयांची उलाढाल थांबून सुवर्ण व्यावसायिक तसेच हस्त कारागिरांवरही परिणाम होत आहे.कोरोनामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. नंतर हे लॉकडाऊन वाढत जाऊन ४ मे २०२० पर्यंत सुवर्ण पेढ्या बंदच राहिल्या. ५ मे २०२० रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला, मात्र जळगावात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुवर्ण व्यवसायिकांनी  स्वतः पुढाकार घेत ८ मे २०२० पासून पेठा बंद ठेवल्या. त्यानंतर थेट ४ जूनला दुकाने सुरू झाली. महिनाभर सुवर्ण बाजार सुरू राहत नाही तोच पुन्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ७ ते १३ जुलै दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. १४ जुलैला सुवर्ण बाजार सुरू झाला. सणासुदीच्या दिवसातदेखील मोठ्या प्रमाणात उलाढालदेखील झाली. मात्र नवीन वर्षात मार्चपासून पुन्हा सुवर्ण बाजाराला झळा सोसाव्या लागत आहे. यात १२ मार्च ते १४ मार्च दरम्यान, जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू,  २८ मार्च ३० मार्चदरम्यान कडक निर्बंध आणि त्यानंतर आता ६ एप्रिलपासून ब्रेक द चेन जाहीर झाल्याने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहणार आहे.कोट्यवधींचा फटकावर्षभरातील सहा वेळा बंद राहण्याचा विचार केला असता सुवर्ण बाजाराला चार ते पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जळगावातील सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस सुवर्ण बाजार बंद राहत आहे. यामुळे विवाहासाठीची अनेकांची सोने-चांदी खरेदी लांबणीवर पडली असून करोडो रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे.    - स्वरूप लुंकड, सचिव,     जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :Goldसोनं